ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे - आमदार आशुतोष काळे

कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानच कामकाज गेल्या काही दिवसापासून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या देखरेखीखाली नियुक्त केलेली समिती पाहत होती.

Board of Trustees of Shirdi Saibaba Sansthan announced
शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर
author img

By

Published : Sep 17, 2021, 3:45 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ राज्य सरकारने राजपत्राद्वारे जाहीर केले आहे. कोपरगावचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार काळे यांचे नाव जाहीर होताच कोपरगावात त्यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतीषबाजी करत आनंद साजरा करण्यात आला.

कोपरगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनिल गंगूले यांची प्रतिक्रिया

राजपत्राद्वारे कायदेशीर नावे जाहीर -

साईबाबा संस्थानच कामकाज गेल्या काही दिवसापासून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या देखरेखीखाली नियुक्त केलेली समिती पाहत होती. त्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड लवकरात लवकर व्हावी असाही दबाव सरकारवर होता. त्यातच न्यायालयाच्या आदेशान्वये निवड प्रक्रिया राबवावी लागल्याने त्यातही मोठा विलंब झाला. मध्यंतरी विश्वस्त मंडळातील काही नावांच्या याद्याही सामाजिक माध्यमातून चर्चेत आल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, आता या सार्‍या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या असून राज्य सरकारने राजपत्राद्वारे विश्वस्त मंडळाच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता दिली आहे.

'या' बारा सदस्यांची नियुक्ती -

सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात अध्यक्षपदी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुहास जनार्धन आहेर यांची संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राहता तालुक्यातील साकुरी येथील अविनाश आप्पासाहेब दंडवते, श्रीरामपूर येथील सचिन रंगराव गुजर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील मुंबई येथील राहुल नरेन कनाल, राहुरी येथील सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंतराव पुंडलिकराव जाधव, शिर्डीतील महेेंद्र गणपतराव शेळके व एकनाथ भागचंद गोंदकर आणि शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष अशा एकूण बारा जणांची नावे राज्य सरकारने आज राजपत्राद्वारे घोषित केली आहेत. याच बरोबरीने शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर हेही पदसिध्द विश्वस्त असतील असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या कालावधीनंतर जगप्रसिद्ध साईबाबांच्या विश्वस्त संस्थेला नवे मंडळ मिळाले आहे.

हेही वाचा - पुणे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; वाचा किती होणार पगारवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.