अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसऱया टप्पा आज (शुक्रवार) पासून जिल्ह्यातील अकोले येथून सुरू होत आहे. मुख्यमंत्री हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस जिल्ह्यात आहेत. नगरच्या शासकीय विश्रामगृह इथे त्यांचा मुक्काम असणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री सकाळी मुंबईहून विमानाने शिर्डी इथे 10 वाजता येतील. तेथून ते अकोले येथे पोहचल्यानंतर सकाळी 11 वाजता अकोले एज्युकेशन सोसायटीच्या आईटीआई कॉलेज पटांगणावर यात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा - पाण्यावरून दोन भाजपशासित राज्यात वाद उकळला; गोवा सरकारची आक्रमक भूमिका
त्यानंतर संगमनेर येथे साडे 11 वाजता जाणता राजा मैदानावर महाजनादेश यात्रा पोहचेल. तेथून ते लोणीकडे प्रस्थान करणार आहेत. दुपारी 2 वाजता लोणी इथे यात्रेचे स्वागत झाल्यावर दुपारी 3 वाजता ही यात्रा राहुरी इथे पोहचणार आहे. येथे वायएमसीए मैदानावर जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर दुपारी 4 वाजता शहरातील एमआयडीसी येथील गजानन कॉलनी, सह्याद्री चौकापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो प्रारंभ होणार आहे.
हेही वाचा - पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन
नवनागपूर, नागपूर, सावेडी, नगर शहरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा रोड शो पार पडणार आहे. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे. उद्या शनिवारी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ही यात्रा काष्टी, ता. श्रीगोंदा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दौंड मार्गे ही यात्रा बारामतीकडे प्रस्थान करणार आहे.
महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने अकोले, संगमनेर, राहुरी, नगर येथील कार्यक्रम रद्द करून पाथर्डी आणि जामखेड येथील सभा पार पडल्या होत्या. त्यावेळी रद्द झालेले कार्यक्रम तिसऱ्या टप्यात घेतले असले तरी नगर येथील रोड शो कायम ठेवत जाहीर सभा मात्र वगळण्यात आली आहे.
हेही वाचा - उदयनराजे राष्ट्रवादीतच, भाजपकडून पक्षांतराच्या अफवा पसरवल्या - धनंजय मुंडे