ETV Bharat / state

Radhakrishna Vikhe Patil : 'सरकारच्या भोंग्याचा आवाज बंद झाला म्हणून विरोधकांचे भोंगे बंद करण्याचा प्रयत्न' - विखे पाटलांची राज ठाकरेंच्या सभेवरुन राज्य सरकारवर टीका

आघाडी सरकारमधील मंत्रीच आता सुरक्षित राहिलेले नाही. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्‍या स्‍विय सहायकावर झालेल्या गोळीबाराची घटना आणि मंत्र्यांना जीवे मारण्याची आलेली धमकी पाहाता राज्‍यातील जनतेला हे सरकार कोणती सुरक्षा देणार, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला आहे. शिवाय सरकारचा आवाज कमी झाल्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil
author img

By

Published : Apr 27, 2022, 9:11 PM IST

अहमदनगर - भाजपा नेते किरीट सोमैया यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ल्याची चौकशी करण्‍याचे सोडून त्‍यांच्‍या जखमेची चौकशी करणे म्‍हणजे अजब सरकारचा गजब कारभार, अशी टीका राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या संदर्भात महाविकास आघाडीवर टीका करताना विखे पाटील म्‍हणाले की, आघाडी सरकारमधील मंत्रीच आता सुरक्षित राहिलेले नाही. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्‍या स्‍विय सहायकावर झालेल्या गोळीबाराची घटना आणि मंत्र्यांना जीवे मारण्याची आलेली धमकी पाहाता राज्‍यातील जनतेला हे सरकार कोणती सुरक्षा देणार, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला आहे. शिवाय सरकारचा आवाज कमी झाल्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात बोलताना, सरकार राज ठाकरेंना का घाबरत आहेॽ तुमचा कारभार जर पारदर्शक आहे, जनता आमच्या पाठीशी असल्याचे तुम्ही सांगता मग सभेला परवानगी का नाकारता. औरंगाबाद येथे शरद पवारांच्या उपस्थितीत शिक्षकांचा मेळावा झालेला चालतो, मग राज ठाकरेंच्या सभेला लगेच जमावबंदीचे कारण सांगितले जाते. तुम्ही कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी आता तुमच्या पापाचा घडा भरला आहे. आघाडी सरकारच्या भोंग्याचा आवाज बंद झाला म्हणून विरोधकांचे भोंगे बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

राज्‍यात भाजपा नेत्‍यांवर पोलिसा देखत खुलेआम हल्‍ले होतात, तरीही पोलीस गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतात. हल्‍ल्‍याची चौकशी करायचे सोडून त्‍यांच्‍या जखमेची कसली कसली चौकशी करता? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नसून आंतकवाद्यांशी संबंध असलेले नबाब मलिक अजूनही मंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे गुंडाचे बळ वाढत असून जनता सहन करत आहे. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजत आहे. सरकारमध्ये सब मिल के खावो असा कारभार चालला आहे. एकत्रित बसून भ्रष्‍टाचार करत आहेत. महसुल खातेही त्‍याला अपवाद नाही, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - Marathi Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात ठिय्या; महाविकास आघाडीविरोधात आक्रमक

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.