ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात भाजपचे नगर जिल्ह्यात धरणे आंदोलन - धरणे आंदोलन महाविकास आघाडी सरकार

श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, राहाता तहसील समोर भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

ahmednagar bjp
विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात भाजपचे नगर जिल्ह्यात धरणे आंदोलन
author img

By

Published : Feb 25, 2020, 4:25 PM IST

अहमदनगर - तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने थांबवल्या असल्याचा आरोप करत भाजपने उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले. यावेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारविरोधात भाजपचे नगर जिल्ह्यात धरणे आंदोलन

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांना स्थगिती देऊन राज्याचा विकास खुंटवला आहे. तसेच या सरकारचा कोणत्याही प्रकारचा वचक पोलीस प्रशासनावर राहिला नसल्याने राज्यात महिला अत्याचार वाढले असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच सरकार स्थापनेवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपने केले आहेत. त्यामुळेच राज्यातील निष्क्रिय सरकारविरोधात भाजपने एल्गार पुकारला असून, उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.

श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, राहाता तहसील समोर भाजप कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तर, संगमनेरातील आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारविरोधात आसूड ओढण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.