ETV Bharat / state

राहुरी तालुक्यातील सडे गावात 'बर्ड फ्ल्यू' चा शिरकाव; 4 हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट

author img

By

Published : Jan 28, 2021, 8:04 AM IST

देशात कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत ठिकठिकाणी लाखो कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. राहुरी तालुक्यातील सडे गावातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे.

bird flu
बर्ड फ्ल्यू

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील सडे गावात श्लोक पोल्ट्री फार्मवर काही दिवसापूर्वी अचानक मृत कोंबड्या आढळल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे नमुने भोपळा येते तपासणीसाठी पाठवले होते. 25 जानेवारीला त्याचा अहवाल आला. या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्ल्यू'ने होत असल्याचे स्पष्ट झाले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्या पोल्ट्री फार्मवरील चार हजार कोंबड्या व त्या पोल्ट्री फार्मपासून सुमारे 1 किलोमीटर परीसरातील कोंबड्याना मारण्याचे आदेश दिले आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष पालवे यांनी ही माहिती दिली.

सडे गावात 'बर्ड फ्ल्यू' चा शिरकाव

चार हजार कोंबड्या केल्या नष्ट -

25 जानेवारीला ( मंगळवारी) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राहुरी तालुक्यातील सडे येथील श्लोक पोल्ट्रीमधील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शीघ्र कृती दलाच्या पथकाने पीपीई किट घालून, पोलीस बंदोबस्तात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 4 हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली. यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते. सडे येथे कोंबड्यांची मरतूक आढळल्यानंतर पोल्ट्री फार्मच्या सभोवताली एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या घरगुती कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे 4 जणांचे एक पथक अशा एकूण 8 पथकांनी पोलीस बंदोबस्तात घरोघरी जाऊन, कोंबड्यांची विल्हेवाट लावली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोल्ट्री फार्मपासून 10 किलो मीटर परिसरातील कोंबड्यांची वाहतूक, विक्री व खरेदीवर 90 दिवसासाठी बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष पालवे यांनी दिली.

नागरिकांना धोका नाही -

कुक्कुटपालन फार्ममधील कोंबड्या मृत होत असल्याचे दिसल्यास, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. 'बर्ड फ्ल्यू' अजूनही मर्यादित स्वरूपात आहे. 'बर्ड फ्ल्यू'मुळे मनुष्यहानी झाल्याचे आजपर्यंत भारतात आढळलेले नाही. त्यामुळे, सद्यस्थितीत अंडी व चिकन खाण्यासाठी कोणताही धोका नाही, असेही संतोष पालवे यांनी सांगितले.

नुकसान भरपाईची मागणी -

सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील चार हजार गावरान कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. पोल्ट्री फार्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सडे गावचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.