ETV Bharat / state

शिर्डी विमानतळावर लवकरच उतरणार मोठी विमाने - Shirdi International Airport latest news

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्यावेळी विमाने उतरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

big plane will land at shirdi airport soon
शिर्डी विमानतळावर लवकरच उतरणार मोठी विमाने
author img

By

Published : Aug 14, 2021, 8:53 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - देश विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता मोठी विमाने देखील उतरू शकणार आहेत. एमएडीसीने शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार केला आहे. त्यामुळे येथे आता मोठी विमाने देखील उतरू शकणार असल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली आहे.

विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवली -

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. आधी या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २५०० मीटर होती. आता ती ३२०० मीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे बोईंग, एअरबससारख्या मोठ्या विमानांचेही लँडिंग होऊ शकणार आहे. त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली आहे.

हवामान खात्याकडून लवकरच लँडिंग साधनसामग्री -

नाईट लँडिंग सुविधेसाठी कॅट १ अप्रोच लाईट्स रन वे लाईट्स बसविण्यावर ९ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच हवामान खात्याकडून लवकरच लँडिंग साधनसामग्री उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली आहे.

हेही वाचा - प्रियकर तुझा की माझा? एका प्रियकरासाठी दोन प्रेयसिंची फ्रिस्टाईल हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.