अहमदनर - राज्यातील विविध भागात विशेषत: सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीसोबतच वित्तहानीही मोठी झाली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सध्या अनेक हात पुढे येत आहेत. तसेच आता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातील सर्व कामगार, अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 2 लाख 51 हजार रुपयांची मदत देणात आली आहे.
कारखाना कर्मचार्यांच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला. अशी माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काटकसर, आर्थिक शिस्त व पारदर्शकता या तत्वावर वाटचाल करतांना सहकारातील मॉडेल म्हणून काम केले आहे.