ETV Bharat / state

मोदी-शाह यांचे सरकार ईडी आणि सीबीआयवर टिकून - भालचंद्र मुणगेकर - भालचंद्र मुणगेकर यांची केंद्र सरकारवर टीका

काही झाले की मोदी सरकार राज्य आणि केंद्रात समन्वय नसल्याचा कांगावा करते. अगोदरच्या केंद्रातील तत्कालीन सरकारने सुद्धा काही प्रमाणात ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला, त्याचे मी समर्थन करणार नाही. मात्र, आज मोदी आणि शहा यांचे सरकार याच शस्त्रांचा वापर करत असल्याची टीका मुणगेकर यांनी केली.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Mar 14, 2021, 4:51 PM IST

अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश आर्थिक दृष्टीने वाढवायचा असेल तर धर्माच्या आधारे विघटन करणाऱ्या शक्तींना त्यांनी पाठबळ देऊ नये, असे वक्तव्य राज्यसभेचे माजी खासदार आणि अर्थतज्ञ्ज भालचंद्र मुणगेकर यांनी केले. संगमनेर येथे स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

अहमदनगर

राम मंदिरानंतर आता काशी आणि मथुराचा नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आगे. हिंदुंच्या व्यतिरिक्त शीख, बुद्धिस्ट अथवा जैन यापैकी कोणी अशी मागणी केली नाही. भाजप आणि आरएसएसच्या पलीकडे कोणत्याही हिंदुंची देखील ही मागणी नाही. मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्या शिवाय सगळ्यांची ही मागणी असल्याची घंटा सरसंघचालक मोहन भागवत बांधत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला असून मोदींनी अशा गोष्टींना पाठबळ देवू नये, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल

अटल बिहारी वाजपेयींनी 1999 मध्ये 24 पक्षांना घेऊन सरकार चालवले होते. राज्यात आज तीन पक्षांचे सरकार आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारसरणी एकसारखीच आहे. सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली मात्र ती स्वागतार्ह आहे. एक पक्ष असला तरी वाद असतात तसे यांच्यात थोडेफार वाद असतील, मात्र राज्याच्या हिताच्या आड तीनही पक्ष या गोष्टी येऊ देणार नाहीत. विरोधी पक्षाने कितीही कांगावा केला तरी महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा आशावाद मुणगेकर यांनी व्यक्त केला.

कायदा करण्याची प्रकिया असते. मात्र ती केंद्र सरकारने राबविली नाही. लोकसभेत थातूर-मातूर चर्चा करून कायदा पास केला. मात्र, राजसभेत अशी काहीच चर्चा केली गेली नाही. काही झालं की मोदी सरकार राज्य आणि केंद्रात समन्वय नसल्याचा कांगावा करते. अगोदरच्या केंद्रातील तत्कालीन सरकारने सुद्धा काही प्रमाणात ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला, त्याचे मी समर्थन करणार नाही. मात्र, आज मोदी आणि शहा यांचे सरकार याच शस्त्रांचा वापर करत असल्याची टीका मुणगेकर यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.