ETV Bharat / state

अहमदनगर : बिअरचा ट्रक उलटला, मद्यपींनी मारला बाटल्यांवर डल्ला - मद्यपींनी मारला बाटल्यांवर डल्ला

शिर्डी येथे बिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील गुहा गावाजवळ टायर फुटल्याने अपघात झाला. ट्रकमधील दारूच्या बाटल्या बाहेर पडल्याने परिसरातील मद्यपींना लाॅटरीच लागली. अवध्या काही वेळात तळीरांंनी येथील सगळ्या बाटल्या लंपास केल्या आहेत.

दारुच्या बाटल्या
दारुच्या बाटल्या
author img

By

Published : May 6, 2020, 8:53 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यात सशर्त मद्याची विक्री सुरू झाली. सुमारे पन्नास दिवसांनंतर मद्य विक्री सुरू झाल्याने तळीराम आनंदाने जास्तीची दारू खरेदी करत आहेत. त्यामुळे दारू व बिअरची मागणी वाढली आहे. त्यातच मद्याची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाल्याने ट्रक उलटून रस्त्यावर दारूच्या बाटल्या पडल्या. परिसरातील तळीरामांनी या दारू बाटल्या लंपास केल्या आहेत. राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावर ही घटना घडली.

घटनास्थळ

शिर्डी येथे बिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावरील गुहा गावाजवळ टायर फुटल्याने अपघात झाला. ट्रकमधील दारूच्या बाटल्या बाहेर पडल्याने परिसरातील मद्यपींना लाॅटरीच लागली. अवध्या काही वेळात तळीरांंनी येथील सगळ्या बाटल्या लंपास केल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच राहूरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत तळीराम दारू घेऊन लंपास झाले.

हेही वाचा - विशेष ट्रेनने १२५१ मजूर शिर्डीहून उत्तर प्रदेशला रवाना; साई संस्थानकडून अन्न पाकिटांचे वाटप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.