अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांना एकटे सोडून पळून न जाता बाजीप्रभूंनी केवळ शिवाजी महाराजांचेच प्राण वाचविले नाही तर स्वराज्यदेखील वाचविले, मी देखील पक्ष्याच्या अडचणीच्या काळात इतरांसारखे पळून न जाता याच बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, असा टोला पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर येथे संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात यांनी राधाकूष्ण विखेंवर जोरदार टीका केली आहे. आज प्रदेशाध्यक्ष कोठे दिसत नाही, असे विचारणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन विरोधीपक्ष नेत्यांनी साडेचार वर्षे जर प्रामाणिकपणे काम केले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. युतीचे सरकार अपयशी सरकार आहे.
हेही वाचा - 'पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा, शेवटपर्यंत जनतेसाठीच काम करणार'
शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही त्यांना लाईनमध्ये उभे केले. खासगी कंपन्यांना 40 हजार कोटींचा फायदा झाला. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी मोर्चा काढला. तो मोर्चा जहाजाचा विमा उतरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयावर गेल्याची टिका सेनेवर केली.
हेही वाचा - शिर्डीत साई पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू, दर्शनासाठी मंदिर रात्रभर खुले