ETV Bharat / state

जागतिक पर्यावरण दिन : संगमनेर नगरपरिषदेला 'माझी वसुंधरा अभियान 2021' अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार - माझी वसुंधरा अभियान 2021

संगमनेर नगरपरिषदेला 'माझी वसुंधरा अभियान 2021' अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या पुरस्काराचा स्वीकार संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे व मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांनी केला. या पुरस्काराचे श्रेय सर्व संगमनेरकरांचे असल्याचे दुर्गा यांनी म्हटले आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:20 PM IST

अहमदनगर - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व पर्यटन विभागाच्या वतीने 'माझी वसुंधरा अभियान 2021'अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नगरपरिषद, नगरपालिका व गावांचा सन्मान करण्यात आला. यात संगमनेर नगरपरिषदेला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार देण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या पुरस्काराचा स्वीकार संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे व मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांनी केला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपणुकीबद्दल सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

'यामुळे' संगमनेर नगरपरिषदेची निवड

संगमनेर नगरपरिषदेने स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर व सुंदर संगमनेर या अंतर्गत विविध योजना राबवल्या. त्यामुळे या पुरस्कारासाठी संगमनेरची निवड झाली. संगमनेर शहर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, आर्थिक समृद्धीसह प्रगतशील शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजनेचा पाणीपुरवठा, गंगामाई घाट सुशोभिकरण, विविध रस्त्यांचे सुशोभिकरण, शहरात असलेल्या विविध बागा, स्वच्छतेला दिले जाणारे प्राधान्य, घंटागाडी, बंदिस्त गटारे, विविध ठिकाणचे सुशोभीकरण, परसबाग निर्मिती, सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण, कचर्‍यापासून गॅस निर्मिती अशा अनेक उपाययोजनांमुळे संगमनेर शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने संगमनेर शहराची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की 'आपण राज्यात विविध दिवस साजरे करतो. हे दिवस फक्त शुभेच्छा देण्यासाठी साजरे न करता कृतिशीलता जपत काम केले पाहिजे. निसर्गाने जे आपल्याला दिले आहे, ते प्रत्येकाने जपले पाहिजे. कोणीही निसर्गाचे वैभव नष्ट करू नका. वृक्षारोपण, संवर्धन, डोंगर-दर्‍या, समुद्र, झाडे, प्राणी ही निसर्गाची देण आहे. त्यामुळे महाराष्ट्र अधिक संपन्न व समृद्ध झाला आहे. ही जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा अभियानामुळे महाराष्ट्राची स्वच्छतेकडे वाटचाल होणार आहे. यामध्ये काही गावांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील सामान्य जनतेसाठी काम करत आहे. आगामी काळात एक सुंदर व समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे'.

'वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा'

'आगामी काळामध्ये नागरिकांनी मोकळ्या जागेमध्ये, रस्त्यांच्या दुतर्फा, जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केले पाहिजे. निसर्ग पूरक जीवन जगणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे', असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

'सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे'

'या अभियानामुळे स्वच्छता संस्कृती वाढीस लागणार आहे. यामध्ये अनेक शहरांनी व गावांनी भाग घेतला. यापुढे उर्वरित गावे व शहरे आहेत, त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा व स्वच्छ महाराष्ट्रासाठी आपण सर्वांनी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे', असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी म्हटले.

पुरस्काराचे श्रेय सर्व संगमनेरकरांना - दुर्गा तांबे

'संगमनेर नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी सातत्याने सहभाग घेतला आहे. बाळासाहेब थोरात व सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपरिषदेला उत्कृष्ट कामाबद्दल यापुर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण दिनानिमित्त मिळालेल्या या पुरस्कारामुळे सर्वांनाच कामासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. आगामी काळात अधिक जोमाने सर्व मिळून काम करत संगमनेर शहराचे वैभव आणखी वाढवतील', असा विश्‍वास नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - मराठा आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आमदार मेटेंचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.