अहमदनगर Assault On Herambh Kulkarni : कुलकर्णी हे अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते व त्यांचे सहशिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी दुचाकी वाहनावरुन घरी जात होते. त्यावेळी नगर शहरातील रासने नगर परिसरात दुचाकी वाहनावरून ते घरी जात होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडविले आणि लोखंडी रॉडने हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली. सुनील कुलकर्णी यांनी हल्लेखोरांपासून हेरंब कुलकर्णी यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. जमाव जमल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
डोक्यावर आणि हाता-पायावर जखमा : शिक्षण क्षेत्राबाबत विविधांगी लेखन करणारे विचारवंत अशी हेरंब कुलकर्णी यांची ख्याती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रासने येथे शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. तसंच हाता-पायावरही रॉडने मारल्यामुळे जखमा झाल्या आहेत. दरम्यान, हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. यावेळी कुलकर्णी यांच्या तब्येतीची मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून फोन करून विचारपूस केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
गुटखा विक्रेत्यांकडून हल्ला : गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही कुलकर्णी यांना दिली. तसंच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी देखील संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अनेक विषयांवर ठोस भूमिका घेऊन लेखन : याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात हेरंब कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, अद्यापर्यंत हल्लेखोरांना अटक झालेली नाही. त्यामुळे सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर ठोस भूमिका घेऊन लेखन केलेलं आहे. अकोले येथील दारूबंदी चळवळ तसंच नगर शहरातील सीताराम सारडा विद्यालय परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी त्यांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. हल्ल्यामागे कोण आहेत याचा अद्याप शोध लागलेला नाही.
हेही वाचा: