ETV Bharat / state

आमदार आशुतोष काळेंनी केली पुष्पाराजची ॲक्शन, कार्यकर्त्यांना केले उत्साहित.. पाहा व्हिडिओ - आमदार आशुतोष काळे पुष्पराज ॲक्शन

भविष्यात कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणे गरजेचे असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी केले.

Ashutosh Kale Pushparaj dialogue
आमदार आशुतोष काळे पुष्पराज ॲक्शन
author img

By

Published : Mar 14, 2022, 5:30 PM IST

मुंबई - भविष्यात कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणे गरजेचे असून, त्यासाठी राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी केले.

पुष्पाराजची ॲक्शन करताना आमदार काळे

हेही वाचा - राज्यातील कुपोषणाचे एक कारण 'बालविवाह'; मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

विधानसभा निवडणुकीत मला निवडून देवून एक जबाबदारी तुम्ही पार पाडली. दोन वर्षांत कोरोना संकट असताना देखील मतदारसंघाच्या विकासासाठी व कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, दुर्दैवाने शहर विकासाच्या बाबतीत राजकारण करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे पडले आहे, असे आशुतोष काळे म्हणाले.

कोपरगाव शहरातील गजानन नगरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये काळे यांनी देखील सहभागी होवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. पुढे बोलताना आशुतोष काळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखांच्या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना आरोग्य, सरकारी कार्यालयातील कामे मार्गी लावण्यासाठी मदत करा. त्यांच्या अडचणी समजून घेवून त्या अडचणी सोडवा. ज्या अडचणी सोडविण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज भासणार आहे, त्या त्या ठिकाणी सर्वोतोपरी मदत करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजप शहर सरचिटणीस शैलेश साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

आशुतोष काळे जेव्हा पुष्पाराजची ॲक्शन करतात

पुष्पा सिनेमातील गाणी, ॲक्शन आणि डॉयलॉग प्रसिद्ध असून त्यापैकी ‘झुकेगा नही’ या डॉयलॉगची ॲक्शन आमदार आशुतोष काळेंनी आपल्या भाषणाच्या दरम्यान करून कार्यकर्त्यांना उत्साहित केले. यावेळी उपस्थित तरुणाईने टाळ्या वाजवून विकासाच्या बाबतीत 'झुकेगी नही राष्ट्रवादी, आगे ही बढेगी राष्ट्रवादी' अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा - Minister Jitendra Awhad : महाराष्ट्रात विकासाची चर्चा होत नाही - मंत्री जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.