अहमनदनगर - राज्य शासनाने साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरे यांची शुक्रवारी नियुक्ती केली. दिपक मुगळीकर यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण डोंगरे यांची नियुक्ती झाली.

२००७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डोंगरे यांनी यापूर्वी अमरावती महानगरपालिका आयुक्त, सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले अरुण डोंगरे १९९१ साली उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले होते.
हेही वाचा - अरविंद सावंतांचे अखेर पुनर्वसन; महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्ष
हेही वाचा - कोरोनाचा थरार.. 'एमबीबीएस'च्या शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेल्या सादियाचा प्रत्यक्ष अनुभव