ETV Bharat / state

लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या भोंदूबाबाला अटक - संगमनेर पोलीस

मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे लग्न जमवून देतो. आजार बरे करून देतो, असे सांगून जादूटोणा करत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. मल्लीआप्पा ठका कोळपे असे त्याचे नाव आहे.

fake baba arrested
लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या भोंदूबाबाला अटक
author img

By

Published : Jan 3, 2020, 1:04 PM IST

Updated : Jan 3, 2020, 3:17 PM IST

शिर्डी - मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे लग्न जमवून देतो. आजार बरे करून देतो, असे सांगून जादूटोणा करत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. मल्लीआप्पा ठका कोळपे (वय ४५) आणि त्याला मदत करणाऱ्या दोघांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून संगमनेर पोलिसांनी रंगेहाथ पकडत जादूटोणा विधेयक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

लग्न जमवण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या भोंदूबाबाला अटक

हेही वाचा - ''अभ्यासपूर्ण पद्धतीने नाटकाकडे पाहण्याचा प्रयत्न 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने व्हावा ही इच्छा''

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मल्लीआप्पा कोळपे हा बाबा, मी खंडोबाचा भक्त असून मी पूजाविधी करून लग्न जमत नसलेल्या मुलांची लग्नं जमवून देतो, असे सांगत लोकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य असलेल्या हरिभाऊ उगले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या भोंदूबाबाचे 'स्टींग ऑपरेशन' केले.

यात मुलाचे लग्न होत नाही. घरात अडीअडचणी आहेत, असे खोटे कारण सांगून भोंदूबाबाला संपर्क साधला. यावेळी बाबाने तुमच्या मुलाचे लग्न होण्यासाठी तुमच्या घरात काही विधी करावा लागेल. विधीसाठी सात हजार रुपये आणि गाडी भाडे असा 10 हजार रुपयांचा खर्च मागितला. ही बाब उगले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संगमनेर पोलिसांच्या मदतीने संगमनेर तालुक्यातील चिखली या गावी जाऊन बाबा पूजा करत असताना त्याला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी या भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना घटनास्थळावरून पूजा साहित्यासह अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे लग्न जमवून देतो दुर्धर आजार बरे करुन देतो असे सांगुन जादुटोणा करत लोकांची आर्थिक फसवणुक करणार्या मल्लीआप्पा ठका कोळपे (वय ४५) आणि त्याला सहकार्य करणार्यी दोघा सहकाऱ्यांना अंधश्रध्दा निर्मुलन समीतीच्या कार्यकर्त्याच्या तक्रारी वरुन संगमनेर पोलिसांनी रंगेहात पकडत जादुटोणा विधेयक कायद्या नुसार गुन्हा दाखल करत त्याब्यात घेतलय....

VO_ कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मल्लीआप्पा कोळपे हा बाबा मी खंडोबाचा भक्त असून मी पुजाविधी करुन लग्न जमत नसलेल्या मुलांची लग्ने जमवुन देतो असे सांगत लोकां कडुन पैसे उकळत असल्याची माहीती सांगत भोंदूगिरी करत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य असलेल्या हरिभाऊ उगले यैंना मिळाल्या नंतर त्यांनी या भोंदूबाबाचे स्टींग ऑपरेशन केले त्या नंतर
मुलाचे लग्न होत नाही. घरात अडीअडचणी आहेत असे खोटे कारण सांगून भोंदूबाबाला संपर्क साधला या वेळी बाबाने तुमच्या मुलाचे लग्न होण्यासाठी तुमच्या घरात काही विधी करावी लागेल. विधीसाठी सात हजार रुपये आणि गाडी भाडे असा दहा हजार रुपयांचा खर्च मागीतला उगले यांनी ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे निदर्शनास आणुन दिली त्या नंतर संगमनेर पोलिसांच्या मतदीने संगमनेर तालुक्यातील चिखली या गावी जावुन बाबा पुजा करत असतांना त्याला रंगेहात पकडलय....

BITE_ रंजना गवांदे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव....

VO_ पोलीसांनी या भोंदु बाबा सह त्याच्या दोन साथीदारांना घटनास्थळी वरुन पुजा साहीत्य लिंबु मिरची अश्या साहीत्या सह ताब्यात घेत त्यांच्या विरोधात जादुटोणा विधेयक कलम 2 नुसार गुन्हा दाखल करत ताब्यत घेतलय....

BITE_दिपाली काळे अतीपीक्त पोलीस अधिक्षक श्रीरामपुर
Body:mh_ahm_shirdi_anis action_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_anis action_3_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 3, 2020, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.