ETV Bharat / state

उपकारागृहात मोबाईलचा वापर; बाळ बोठेविरोधात अजून एक गुन्हा दाखल होणार

चर्चेत असलेल्या यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.

Bal Bothe
आरोपी बाळ बोठे
author img

By

Published : May 20, 2021, 6:32 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असलेल्या यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे. मागील महिन्यात पारनेर उपकारागृहात दोन आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. या मोबाईलचा वापर आरोपी बाळ बोठे याने केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. बाळ बोठेने मोबाईलचा वापर केल्याने त्याच्याविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कारागृह तपासणीत दोन आरोपींकडे आढळले मोबाईल-

मागील महिन्यात नगर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची अचानक झडती घेतली होती. यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन आणि अविनाश निलेश कर्डिले यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले होते. त्यांना जेवण देणाऱ्या सुभाष लोंढे आणि प्रवीण देशमुख यांनी हे मोबाईल आरोपींना पोहोच केले होते. त्यामुळे पोलिसांनी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत.

बोठे कुणाला करत होता फोन याचा तपास होणार-

ज्या बराकीत मोबाईल सापडले तेथे बाळ मोठे यालाही ठेवण्यात आले होते त्यामुळे बोठे पण मोबाइलचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होत. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास करत असताना बोठे याने त्या मोबाईलचा वापर केला असल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे बोठेला कारागृहात मोबाईल वापरल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. दरम्यान रेखा जरे हत्याकांडातील आरोपी असलेला बाळ बोठे याने मोबाइलचा वापर केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या मोबाईल वरून बाळ बोठेने कुणाला फोन केला, त्यांच्यात काय बोलणे झाले याचा संपूर्ण तपास आता पोलीस करणार आहेत.

हेही वाचा - केंद्रातर्फे गुजरातला केलेल्या मदतीवर राजकारण करू नये - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.