ETV Bharat / state

काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली; अजित पवारांची पिचडांवर टीका - ahmednagar news

पिचडांनी लावलेला काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळीबाजू दिसायला लागली आणि ते भाजपात गेले, अशा शब्दात अजित पवारांनी पिचडांचे नाव घेता टीका केली. अकोलेतील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

अजित पवार
author img

By

Published : Sep 23, 2019, 5:47 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मधुकर पिचडांना राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेत चांगल स्थान दिले होते. मात्र, पिचडांनी लावलेला काळा चष्मा काढल्यानंतर त्यांना त्यांची काळी बाजू दिसायला लागली आणि ते भाजपात गेले, अशा शब्दात अजित पवारांनी पिचडांचे नाव घेता टीका केली. अकोलेतील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

बोलताना अजित पवार

मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अकोले विधानसभा मतदार संघातील पिचड विरोधकांची मोठ बांधत आज भाजपातील अनेकांना अकोल्यातील जाहीर सभेत प्रवेश दिला.

हेही वाचा - माध्यमांत चमकण्यासाठी लोक पवारांवर टीका करतात - रोहित पवार

पवार पुढे म्हणाले, अकोले तालुक्यातील सर्वांनी एकत्र येत पिचडांविरोधात एकच उमेदवार देण्याचे ठरवा आणि त्यावर कायम राहा. पिचड फार नाटकी आहेत ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे सांगतील, डोळ्यांत आश्रु आणतील मात्र त्यांच्या भुल थापांना बळी पडु नका, असे आवाहन पवारांनी केले.

हेही वाचा - राष्ट्रवादीतील 'त्या' नेत्याची दादागिरी भविष्यात खपवून घेणार नाही - माजी महापौर कळमकर

सीताराम गायकरचे काय झाले असा जनतेतून सूर उमटला असता विधानसभेला घड्याळाला मतदान करा. मग त्यांचे (सीताराम गायकर) धोतर फेडू, असे म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला. आपल्या भाषणातून भाजपवर हल्लाबोल करत आमचे सरकार आले तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. हे भाजपवाले थोर पुरूषांची नावे घेऊन सत्तेवर आले. पण, कोणतेही आश्वासन पूर्ण केली नाहीत, अशी टीकाही पवारांनी केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने मधुकर पिचडांना राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेत चांगल स्थान दिल होत मात्र पिचडांची चुक झाल्याने त्या चुकीवर पांघरुण घालण्या साठी पिचडांनी दुसर्या पक्षात प्रवेश केल्याची टिका अजीत पवारांनी आज अकोलेतील सभेत बोलतांना केलय....

VO_मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजपा प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादी कॉग्रेसने अकोले विधानसभा मतदार संघातील पिचड विरोधकांची मोठ बांधत आज भाजपातील अनेकांना अकोल्यातील जाहीर सभेत प्रवेश दिलाय...अकोलेतील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडुन गेलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवलाय.राष्ट्रवादीने पिचडांना अनेक पदे दिली होती मात्र तरीही ते पक्ष सोडुन गेलेत त्यांनी
मोठं पाप केलय. पिचडांनी लावलेला काळ्या चष्मा काढल्या नंतर त्यांना काळीबाजु दिसायला लागली वारे दिवट्या अश्या शब्दात अजीत पवारांनी पिचडांच नाव घेण्याच टाळक टिकेची झोड उठवलीये....

BITE_ अजीत पवार राष्ट्रवादीचे नेते

VO_अकोले तालुक्यातील सर्वांनी एकत्र येत पिचडांन विरोधात एकच उमेदवार देण्याच ठरवय त्या वर कायम रहा पिचड फार नाटकी आहेत ही माझी शेवटची निवडणुक आहे इस सांगतील डोळ्यात आश्रु आणतील मात्र त्यांच्या भुल थापांना बळी पडु नका अस आवाहन पवारांनी केलय....

BITE_अजीत पवार राष्ट्रवादीचे नेते

VO_सर्व पिचड विरोधकांनी आता राष्ट्रवादीच्या बँनर खाली एकत्र राहावे पिचडांना कोणतेही हतखंडे राबवु द्या मात्र त्यांनी हे लक्षात ठेवाव की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी असतात आमच्या कार्केयकर्सात्यांच्या केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड पिता – पुत्रांना दिलाय. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला असता विधानसभेला घड्याला मतदान करा मग त्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडू,असं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवलाय आपल्या भाषणातुन भाजपवर हल्लाबोल करत आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले..पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत अशी टिकाही पवारांनी केलीये....Body:mh_ahm_shirdi_aajit pawar_meetings_23_visuals_bite_mh10010

Conclusion:mh_ahm_shirdi_aajit pawar_meetings_23_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.