ETV Bharat / state

मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा; खासदार अमोल कोल्हेंचे सरकारला आव्हान

शिवस्वराज्य यात्रा गुरूवारपासून उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत असून अनेक ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, या यात्रेनिमित्त बुधवारी संध्याकाळी अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला गाजर दाखवलं अशी अजित पवार यांनी टीका केली, तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा असे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला आव्हान दिले.

गाजर
author img

By

Published : Aug 8, 2019, 11:42 AM IST

अहमदनगर - शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ही यात्रा गुरुवारपासून उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. अहमदनगरमध्ये ही यात्रा बुधवारी सायंकाळी पोहोचल्यानंतर यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीवर आणि ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली.

अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन

शिवस्वराज्य यात्रा गुरूवारपासून उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत असून अनेक ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर, या यात्रेनिमित्त बुधवारी संध्याकाळई अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेला अनेक कोटींची आश्वासने दाखवली. नगर जिल्ह्यात साकलाई पाणी योजनेचे आश्वासने दिले. प्रत्यक्षात निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणतेही आश्वासन पूर्ती त्यांनी केलेली नाही. तसेच अहमदनगरसाठी 300 कोटी रुपये दिले नाही. केवळ गाजर दाखवण्याचे काम त्यांनी केले, अशी खरमरीत टीकाही त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना जनादेश मागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर एवढा मोठा विश्वास असेल तर मग ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यावे. यासाठी हे सरकार का घाबरत आहे? असा प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकणचे निकाल संशयास्पद असल्याचे सांगताना अमोल कोल्हे यांनी सरकारला त्यांच्या कामगिरीवर विश्वास असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा, असे आव्हान दिले.

Intro:अहमदनगर- मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं गाजर अजित पवार यांची टीका, तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा खा.अमोल कोल्हे यांचे सरकारला आव्हान.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_shiv_swarajy_nagar_vij_7204297

अहमदनगर- मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं गाजर अजित पवार यांची टीका, तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा खा.अमोल कोल्हे यांचे सरकारला आव्हान..

अहमदनगर- शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ही यात्रा आजपासून उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. अहमदनगर मध्ये ही यात्रा काल सायंकाळी पोहोचल्यानंतर यानिमित्ताने आयोजित जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खा.अमोल कोल्हे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीवर आणि ईव्हीएम मशीन वर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जोरदार टीका केली. अजित पवार यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत जनतेला कोटी रुपयांचे आश्वासने दाखवले. नगर जिल्ह्यात साकलाई पाणी योजनेचे आश्वासने दिले. प्रत्यक्षात निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कोणतेही आश्वासन पूर्ती त्यांनी केलेली नाही. अहमदनगर साठी 300 कोटी रुपये दिले नाही. केवळ गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलं, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर केली.

स्वतःच्या कामगिरीवर विश्वास असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा..
-यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी जनादेश मागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या पाच वर्षाच्या कामगिरी एवढा मोठा विश्वास असेल तर मग ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर मतदानाला हे सरकार का घाबरत आहे असा प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकणचे निकाल संशयास्पद असल्याचे सांगताना अमोल कोल्हे यांनी सरकारला त्यांच्या कामगिरीवर विश्वास असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा असं आव्हान दिले. शिवस्वराज्य यात्रा आजपासून उत्तर नगर जिल्ह्यात प्रवेश करत असून अनेक ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं गाजर अजित पवार यांची टीका, तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा खा.अमोल कोल्हे यांचे सरकारला आव्हान..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.