ETV Bharat / state

राहुरी महसूल प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून ‘हे राम’ म्हणत ग्रामस्थांनी रचले सरण...! - वाळू तस्करी अहमदनगर उपोषण

प्रवरा नदीपात्रातून सुमारे 74 लाखांची वाळू तस्करी झाल्यानंतर संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाकडून दिले. मात्र, वर्ष उलटले तरी वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या 'महसूल'च्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी हा अनोख्या उपोषणाचा पवित्रा घेतला.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Oct 3, 2020, 5:30 PM IST

अहमदनगर - राहुरी महसूल प्रशासनाच्या संशयित कारभाराला कंटाळून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘हे राम’ म्हणत स्मशानभूमीत सरण रचून त्यावर बसून धानोरे (ता. राहुरी) येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून सुमारे 74 लाखांची वाळू तस्करी झाल्यानंतर संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाकडून दिले. मात्र, वर्ष उलटले तरी वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणार्‍या 'महसूल'च्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी हा अनोख्या उपोषणाचा पवित्रा घेतला.

स्मशानभूमीत सरण रचून उपोषण

आज उपोषणाचा दुसरा दिवस असून वाळूचोरी प्रकरणातील दोषी महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्मशानातील बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रवरा नदीपात्रातून गेल्या काही वर्षांपासून खुलेआम अनधिकृत वाळू उपसा केला जात असल्याने याच वाळू प्रकरणी गेल्यावर्षी बापू दिघे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी नदीपात्रातील चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा केला. त्यात सुमारे 74 लाखांची वाळू चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधित वाळू तस्कर व महसूल कर्मचार्‍यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन राहुरीच्या तहसीलदारांनी दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.

हेही वाचा - गांधी जयंती दिनी स्मशानभूमीत आंदोलन; महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

वर्षभर आम्ही या वाळू चोरीविरोधात महसूल विभागातील खालीपासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नाही. उलट दोषी अधिकारी व वाळू तस्करांना पाठीशी घालण्याचे काम महसूलचे अधिकारी करीत असल्याने आम्ही न्यायासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. दोषींवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते आदिनाथ दिघे यांनी सांगितले.

अनधिकृतपणे अमर्याद वाळू उपशामुळे संपूर्ण प्रवरा नदीपात्र उजाड होत चालले आहे. महसूलच्या अधिकार्‍यांचे हात या अवैध वाळू उपशात ओले होत असल्याने त्यांचा वाळू तस्करांना आशीर्वाद असल्याचे उघड झाले असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास कोणीही धजावत नाही. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात आम्हाला न्यायासाठी स्मशानात उपोषणास बसावे लागत असून आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू ठेवणार आहे. कालपासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी पाठ फिरवली असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - गांधी जयंती दिवशी सुरू असलेले दारू दुकान बंद करण्यास पाडले भाग..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.