ETV Bharat / state

अहमदनगर - जिरेनियम शेतीतून तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचे घेतले उत्पन्न

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली आहे. त्याच बरोबरीने डिसलरी प्रकल्प ही उभारत ते स्वतः तेलनिर्मिती देखील करत असुन त्यांनी ‘फार्म टू बॉटल’ या संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी जिरेनियम शेतीतून तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचा नफा मिळवला आहे.

Ahmednagar - Two acres of geranium farm yielded Rs 2.5 lakh in three months
जिरेनियम शेतीतून दोन एकर शेतीत अडीच लाखाचे घेतले उत्पन्न
author img

By

Published : Jun 11, 2021, 6:36 AM IST

अहमदनगर - गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शेतात तेच ते पारंपरिक खाण्यांच्या पिकांचीच शेतीत मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील राहता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली. जिरेनियमच्या पाल्यापासून तेल तयार केले. या तेलाला १२ हजार ५०० रुपये लीटर या दर मिळाल्याने तीन महिन्यात दोन एकर शेतीत दोन लाखाचा नफा मिळवला आहे.

जिरेनियम शेतीतून तीन महिन्यात दोन एकर शेतीत अडीच लाखाचे घेतले उत्पन्न

जिरेनियमचे तेल १२ हजार ५०० रूपये लीटर -

राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील स्वप्निल दौंड या प्रयोगशील शेतकऱ्यांने आपल्या शेतात जिरेनियमची लागवड केली आहे. त्याच बरोबरीने डिसलरी प्रकल्प ही उभारत ते स्वतः तेलनिर्मिती देखील करत असुन त्यांनी ‘फार्म टू बॉटल’ या संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. जिरेनीयमच्या पानांवर प्रक्रिया करुन त्यापासुन तेल तयार केले जाते. या तेलाला मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. आपण दैनंदिन वापरत असलेल्या सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी जिरेनीयम तेलाचा वापर केला जातो. सध्या तरी तब्बल १२ हजार ५०० रूपये लीटर प्रमाणे दर या तेलाला मिळत असल्याचे स्वप्निल दौड यांनी सांगितले आहे.

पहिल्या कापणी नंतर लगेच उत्पन्न सुरु -

जिल्ह्याबरोबर राज्यातील अनेक शेतकरी जिरेनीयमच्या शेतीकरण्याकडे कल वाढतोय. अनेक तरुण शेतकरी याची लागवड शेतीत करत आहे. अगदी सहज पिकणारे हे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके सोडून जिरेनियमची शेती करण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर येथील काही तरुणांनी नगर जिल्ह्यात येऊन या शेतीची माहिती घेतली. व घरच्या शेतीत त्याची लागवड केली. सहा रुपयांना जिरेनियमचे एक रोप मिळते. पहिल्या तीन ते चार महिन्यात याची कापणी होते. पहिल्या कापणी नंतर लगेच उत्पन्न सुरु होते.

तर हमखास उत्पन्नाच हे चांगले साधन -

भारतीय बाजारपेठेतील जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून हे तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे भारतात याची लागवड वाढली तर त्याचा फायदा होईल. एका किलोला साडे बारा हजार रुपये मिळत असल्याने शेतकरी याकडे वळु लागले आहे. मात्र या पुर्वीची काही अनुभव पाहता आणि आताच्या डिजीटल युगात शेतकऱ्यांनी कंपन्यांशी करार करतांना व्यवस्थित माहिती घेऊन करार केल्यास हमखास उत्पन्नाच हे चांगले साधन होईल. असे शेतकरी रामभाऊ गुळवे म्हटले आहे.

बाजाराचा पूर्ण अभ्यास करा -

पारंपारिक शेतीमध्ये उत्पन्नाची हमी नसल्याने या पिकाकडे शेतकरी वळु लागलेत. त्यात विकेल ते पिकेल राज्याचा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदतही घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनीही बाजाराचा पूर्ण अभ्यास करुन या क्षेत्रात पाऊल ठेवले पाहिजे. असे गुळवे म्हणाले.

दर तीन महिन्यांनी कापनीसाठी येते जिरेनियम -

अहमदनगर जिल्हातील शेतकरी नेहमीच नाविन्यपुर्ण शेती करत आले आहे. त्यात शेतीत विविध प्रयोग करुन विक्रमी उत्पादनाबरोबर आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या जिल्ह्यात काही भागातील शेतकरी जिरेनियम या सुगंधी वनस्पतची सध्या लागवड करु लागले आहेत. नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात प्रामुख्याने पेरु, ऊस आणि डाळींबाची लागवड केली जाते. मात्र वर्षाला एकदाच येणाऱ्या पिकांऐवजी दर तीन महिन्यांनी कापनीसाठी येणाऱ्या जिरेनियमची लागवड आता या भागातील शेतकऱ्यांनी सुरु केली आहे.

हेही वाचा - खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती हमीभाव ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.