अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या श्रीपाद छिंदम यांनी नगर शहर मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज भरा आहे. बहुजन समाजवादी पक्षाकडून छिंदम यांनी निवडणूकीच्या मैदानात रिंगणात उडी घेतली आहे.
हेही वाचा... एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज
अहमदनगरचे भाजपचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होता. मात्र तरीही अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडून आले. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीपाद छिंदम यांनी उडी घेतली आहे. एकीकडे शिवसेनेकडून अनिल राठोड तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप निवडणूक लढवत आहेत. यातच छिंदम यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वंचितकडून किरण काळे हे मैदानात असल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत असणार आहे. मात्र मुख्य लढत ही संग्राम जगताप आणि अनिल राठोड यांच्यात असेल असे मानले जात आहे.
हेही वाचा... 'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा