अहमदनगर - येथील स्वस्तिक चौकाजवळील 'ब्ल्यू डायमंड' मसाज पार्लर सेंटरमध्ये सुरू असणारे सेक्स रॅकेट पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने उघडकीस आणले आहे. पथकाने यावेळी एक पुरुष व महिलेला पकडण्यात आले आहे. कारवाईबद्दल समजताच अन्य ग्राहकांची धावपळ झाली. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
.
शहरातील नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटमुळे चागंलीच खळबळ उडाली आहे. प्रदीपकुमार गोपालशेट्टी (रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर - पुणे महामार्गावर स्टेशन परिसरातील स्वस्तिक चौकात 'ब्ल्यू डायमंड मसाज पार्लर सेंटर' आहे. या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालतो, अशी गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ब्ल्यू डायमंड मसाज पार्लरवर छापा टाकला. यावेळी छाप्यात एक पुरुष व महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.