अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी एक आठ सदस्यांच्या कमिटी स्थापन करून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी होणार असल्याची माहिती दिली.
Ahmednagar Hospital Fire Live Updates: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट, आठ सदस्यांची चौकशीसाठी समिती स्थापन करणार - अहमदनगर न्यूज
19:55 November 06
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट, आठ सदस्यांची चौकशीसाठी समिती स्थापन करणार
18:52 November 06
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत.
15:44 November 06
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे. घटनेची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश डीसींना दिले आहेत असे त्यांनी सांगितले.
15:44 November 06
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये आज लागलेल्या आगीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
14:13 November 06
मृत्यूमुखी पडलेले सर्वजण 60 ते 70 वयोगटातील असल्याची माहिती आहे.
14:13 November 06
घटनास्थळी तातडीने आमदार संग्राम जगताप हे दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली.
14:12 November 06
गंभीर रुग्णांना बघून त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
14:06 November 06
4 महिला, सहा पुरूष असे मिळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांची ओळख पटली असून एका पुरूषाची ओळख अद्याप पटलेली नाही.
- रामकिशन विठ्ठल हरपुडे
- सिताराम दगडू जाधव
- सत्यभामा शिवाजी घोडेचौरे
- कडूबाई गंगाधर खाटीक
- शिवाजी सदाशिव पवार
- कोंडाबाई मधुकर कदम
- आसराबाई गोविंद नागरे
- शबाबी अहमद सय्यद
- दीपक विश्वनाथ जडगुळे
14:05 November 06
Ahmednagar Hospital Fire Live Updates: अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वार्डाला आग; 11 जणांचा मृत्यू
अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी यातील किमान 11 रुग्ण हे दगावले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दहा मृत्यू झाल्याला पुष्टी दिली आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती आहे. सूत्रांच्या माहिती नुसार 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आयसीयू वार्डात 17 कोरोना रुग्ण होते.