ETV Bharat / state

Grape Grower Farmer : शेतकऱ्यांनाच द्राक्ष आंबटच, छाटणीविना माल बागेतच टांगलेला

अहमदनगर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा द्राक्ष आबंटच ठरली आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागेत हिरवी गार द्राक्ष्यांची घडे लटकलेलीच दिसुन येतायेत. मात्र ही द्राक्षे व्यापाऱ्यांनी खरेदी करावी, यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश विनवणी करावी लागतेय. ( Ahmednagar Grape Growers Farmers in crisis )

Grape Grower Farmer
शेतकऱ्यांनाच द्राक्ष आंबटच
author img

By

Published : May 28, 2022, 6:08 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा द्राक्ष आबंटच ठरली आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागेत हिरवी गार द्राक्ष्यांची घडे लटकलेलीच दिसुन येतायेत. मात्र ही द्राक्षे व्यापाऱ्यांनी खरेदी करावी, यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची अक्षरश विनवणी करावी लागतेय. ( Ahmednagar Grape Growers Farmers in crisis )

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार - जिल्ह्यात सुमारे 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यंदा सरासरी 15 ते 17 टन एवढे विक्री उत्पादन झाले. मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किलोमागे 50 रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उशिराने बागेची छाटणी केली होती. मात्र असे न घडता आता उत्तरेकडील राज्यातून द्राक्षांची मागणी घटल्याने व्यापारी माल खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे हा माल वाईन कंपन्यांना विकावा लागणार आहे. मात्र दहा रुपये किलो पेक्षाही कमी दराने माल कंपन्या घेतील त्यात शेतकर्यानेत मालाची तोडणी, भरणी करुन माल कंपनीपर्यंत माल पोहोच करायता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार हा प्रश्न आहे.

द्राक्ष बागेची छाटणी करण्याचे शेतकऱ्यांवर संकट - राहाता तालुक्यातील जळगाव चितळी परीसरात तर द्राक्ष बागाच भयावह वास्तव्य बघावयास मिळतय. येथील सर्जेराव चौधरी या युवकाने चांगल्या पगाराची नौकरी सोडुन द्राक्ष शेती केली. त्याने क्रॉप सायन्सच शिक्षणही घेतलेल्या आहे. मात्र निसर्गाचे पुढे त्यानेही हात टेकले. गेल्या डिसेंबरमध्ये या परिसरात अवकाळी गारपिटीने द्राक्ष बाग झोडपली गेली. त्याचा परिणाम आता दिसुन आलाय. चौधरी यांचा माल काढणीला आला. मात्र अवकाळीच्या फटक्यामुळे द्राक्षाला गोडी उतरली नसल्याने शेकडो टन माल खाण्या लायक राहिला नाही. तो चार दिवसात पड्या भावाने का होईना, वाईन कंपन्यांनी घेतला नाही तर पुढील आठवड्यात तो खराब होणार आहे. त्यामुळे मालासह बागेची छाटणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

व्यापारी द्राक्ष बागेकडे फिरकत नाहीत - नाशिकमधील मालाची मागील महिन्यातच पूर्णपणे विक्री झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मालाला व्यापाऱ्यांची पसंती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या व्यापारी द्राक्षे खरेदी करण्यासाठी बागेकडे फिरकायला तयार नाहीत, असे चित्र आहे. आठ ते दहा रुपये किलो दरानेही व्यापारी माल खरेदीला इच्छुक नाहीत. 170 दिवस माल बागेत राहिला तर तो खराब होतो. पुढील वर्षी त्यामुळे उत्पादनाला फटका बसतो. त्यामुळे बागेची छाटणी अर्थात हिरवी पाने काढुन टाकत बागेतच माल टाकून सागर साबदे याच्या बागेत दिसुन आले.

या गोष्टींमुळे बसला फटका - सरकारने दीड महिन्यापूर्वीच द्राक्षनिर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे निर्यातक्षम मालही स्थानिक बाजारात पडून राहिला. त्याचबरोबर मार्च महिन्यातच पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे द्राक्षांची नैसर्गिक वाढ कमी झाली. माल पक्व झाल्यामुळे घडातील द्राक्षांची गळती होते. त्यामुळे व्यापारी माल खरेदी करायला इच्छुक नाहीत असे चित्र आहे.

हेही वाचा - Women Protest Against Water Scarcity : नाशिकमध्ये महिलांचा रस्ता रोको; म्हणाल्या, कामावर जाण्याऐवजी पाण्यासाठी करावी लागते वणवण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.