अहमदनगर - वटपौर्णिमा तसा एक पौराणिक कथा आणि संदर्भ असलेला एक पारंपरिक सण. या दिवशी लग्न झालेल्या महिला शक्यतो नऊवारीत सजून-धजून वडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दोरा बांधून दोऱ्यासह सात फेरे मारले जातात आणि आपल्या सौभ्याग्याला उत्तम आरोग्य मिळावे आणि पुढील सातही जन्मी हाच जोडीदार मिळावा अशी मागणी करतात. याच पारंपरिक सणाचे औचित्य साधून नगर मधील आहारतज्ञ (डायटीशन) डॉ. आदिती पानसंबळ यांनी नऊवारी साडीत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज केलं. या बाबतचा त्यांचा एक व्हिडिओ आज चांगलाच व्हायरल झाला असून डॉ. आदिती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घर आणि नोकरी सांभाळताना पौष्टीक आहार आणि नियमित व्यायाम हा गरजेचा असतो. मात्र नेमके त्याकडेच महिला वर्गाचे दुर्लक्ष दिसून येते. त्यामुळे आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपली परंपरा आणि व्यायामाचे महत्व याची जाणीव महिला वर्गात व्हावी, म्हणून पारंपरिक नऊवारी साडीत जिममध्ये विविध व्यायाम अर्थात जिम एक्सरसाईज केलं, असेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - अहमदनगर : महापौर निवडणुकीसाठी सेना-राष्ट्रवादीत युती, काँग्रेसचा तीव्र संताप...पाहा व्हिडिओ
हेही वाचा - कोपरगाव बसस्थानकावर खळबळ, मुलीचे अपहरण करणाऱ्याला नागरिकांचा दणका