ETV Bharat / state

नगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल - पालकमंत्री हसन मुश्रीफ

खरीप हंगामात खते-बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरियाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदिवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ
author img

By

Published : May 14, 2021, 11:45 AM IST

Updated : May 14, 2021, 12:39 PM IST

अहमदनगर- खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकर्‍यांना जाणवणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. तसेच जिल्ह्याचा जीडीपीत चांगल्याप्रकारे वाढ होईल हे लक्षात घेवून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने एकत्रित प्रयत्न आणि मार्गदर्शन करावे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत बियाणे आणि खतांसाठी शेतकर्‍यांची अडचण होणार नाही. याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तसेच यंदा जिल्ह्यात कृषीचा जीडीपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात क्रमांक एकवर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री हसन मुश्रीफ
खते, बियाणांचा पुरवठा सुरळीत करा-

पालकमंत्री मुश्रीफ यांनी खरीप हंगाम-२०२१ च्या या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांना खते- बियाणांची अडचण येता कामा नये. खरीप हंगामात खते-बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरियाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदिवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन नियोजन करावे.

शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचे निर्देश-

खरीप हंगामासाठी सहकारी-राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्षांकाप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनास दिले. कुकडी प्रकल्पातील जिल्ह्याच्या हक्काचे पाणी जिल्ह्यास मिळेल, त्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि कृषि सहसंचालक बिराजदार यांनी जिल्ह्यातील आगामी खरीप हंगाम नियोजनाची माहिती सादर केली.

Last Updated : May 14, 2021, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.