ETV Bharat / state

राहुरी अत्याचार प्रकरण: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्ता रोको - राहुरी अत्याचार प्रकरण

13 वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केला होता. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तो अनेक दिवसांपासून फरार होता. या आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Jan 12, 2020, 7:57 AM IST

अहमदनगर - राहुरी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी महेश चाचरला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करत करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने रस्ता रोको

13 वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने अत्याचार केला होता. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, तो अनेक दिवसांपासून फरार होता. शनिवारी मध्यरात्री राहुरी पोलिसांनी महेश चाचरला अटक केली. शाळेचा संस्थाचालक आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केला. त्यामुळे या संस्था चालकावर कारवाई करण्यात यावी, यासाठी नगर-मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट : एनडीआरएफमार्फत बचावकार्य सुरू, पालकमंत्र्यांनी दिली घटनास्थळी भेट..

प्रविण लोखंडे, यमुना भालेराव, बाळासाहेब जाधव, जालिंदर घिगे, अरुण साळवे, अंकुश बर्डे, बबन साळवे, दिपक त्रिभुवन, संजय संसारे, किरण साळवे यांच्यासह रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Intro:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने रस्ता रोकोBody:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने रस्ता रोको

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत 13 वर्षिय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या महेश चाचर या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या संस्था चालकावर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा रिपब्लिकन पार्टीच्या वतिने राहुरीत चक्काजाम रस्तारोखो आंदोलन छेडण्यात आले होते.

राहुरी तालुक्यातील एका शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर शाळेतील देखरेख करणाऱ्या कर्मचा-याने अत्याचार केला होता, आरोपीवर गुन्हा दाखल होऊनही अनेक दिवसांपासून आरोपी महेश चाचर हा फरार होता .मध्यरात्री राहुरी पोलिसांनी महेश चाचरला बेड्या ठोकल्या आहेत..संबधित संस्थाचालक आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप RPI चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केलाय, या संस्था चालकावर कारवाई व्हावी यामागणी साठी आज राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको अांदोलन छेडण्यात आले होते.

यावेळी प्रविण लोखंडे, यमुना भालेराव ,बाळासाहेब जाधव,जालिंदर घिगे, अरुण साळवे,अंकुश बर्डे,बबन साळवे,दिपक त्रिभुवन, संजय संसारे,किरण साळवेंसह आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी मोर्चाकरांशी बोलतांना म्हटले की या घटनेशी संमधित असणारया आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.Conclusion:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने रस्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.