शिर्डी (अहमदनगर) - राज्यात असलेल्या रात्रीच्या जमावबंदी आदेशामुळे रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत साईबाबा मंदिर भाविकांनासाठी बंद ठेवण्यात आले ( Sai Baba Temple Closed ) आहे. तसेच सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत साईबाबा मंदिर भाविकांनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी आज सकाळपासूनच साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दरवर्षी 31 डिसेंबरला शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत ( Crowd Of Devotees For Darshan Shirdi ) असते. त्यामुळे साईबाबा संस्थानकडून रात्रभर साई मंदिर ( Sai Baba Temple Shirdi ) भाविकांना दर्शनासाठी खुल ठेवण्यात येतं. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आज रात्री जरी मंदिर बंद असले तरी, उद्या नवीन वर्षा निमित्ताने साईबाबांचे मंदिर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
गर्दी होऊ नये म्हणून काळजी
आज रात्री साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये, कोरोनाचे नियम पाळले जावे यासाठी शिर्डीत संस्थानबरोबर शिर्डी पोलीसही सज्ज झाले आहेत. पाच पेक्षा जास्त भाविकांनी मंदिर परिसरात एकत्र येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त शिर्डीत तैनात करण्यात आला आहे. दर वर्षी रात्री बाराच्या सुमारास साई मंदीराच्या गाभार्यात उपस्थित राहणाऱ्या भक्तांना संध्याकाळीच धूप आरती करत समाधान मानावे लागनार आहे.
२० अधिकारी ३०० पोलीस कर्मचारी तैनात
धार्मिक पर्यटनासाठी शिर्डीत आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. रात्रीची जमावबंदी मोडली जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. आज रात्रीची भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी शिर्डीत 20 अधिकारी आणि 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला ( Large police contingent deployed in Shirdi ) आहे. शिर्डीतील रस्त्यावरुन या फौजफाट्याने रूट मार्च ( Police Rootmarch Shirdi ) केला. गर्दी नियंत्रणात कशी करायची याच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्यात आहेत.
तृतीयपंथीयांनी केली प्रार्थना
नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने व्हावी यासाठी आज साईबाबांच्या शिर्डीत देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. यासह तृतीयपंथी भाविकही देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी तृतीयपंथीनी साईचरणी प्रार्थना केलीय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज देश भरातील भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर देशातील अनेक भागातील तृतीयपंथी देखील मोठ्या प्रमाणात शिर्डीत दाखल झाले आहे. देशावर आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी तृतीयपंथीनी नवीन वर्षाची साईचरणी प्रार्थना केली आहे. दरवर्षी 31 डिसेंबरला भाविकांना बरोबर तृतीयपंथी देखील साईबाबांच्या शिर्डीत दाखल होतात. साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देत असतात. यावेळी भाविकांकडून मिळणाऱ्या मंगतीतील काही पैसे बाबांना दान म्हणून देतात. काही पैसे, साईबाबांचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. तसेच आपल्या बरोबर देशातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जाण्यासाठी तृतीयपंथी प्रार्थना करतात.