ETV Bharat / state

डाळींबाच्या झाडावर निमॅटोडचा प्रकोप, रोगाच्या नियंत्रणासाठी 'निमिट्ज' औषध तयार

डांळींब पिकाच्या मुळावर निम्याटोड नावाच्या रोगाने हल्ला केला आहे. या रोगामूळे झाडाच्या मुळाशी गाठी तयार होतात व डाळींबाला दिले जाणारे खत पाणी झाडाला मिळत नाही. त्यामुळे झाडाची वाढ आणि फळधारणाही कमी होते. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अदामा कंपनीने निमीट्ज नावाचे औषध तयार केले आहे.

author img

By

Published : Jun 24, 2019, 7:40 PM IST

Updated : Jun 24, 2019, 11:50 PM IST

निम्याटोडचा प्रकोप

अहमदनगर - दुष्काळ, पाणी टंचाई, पिकाला मिळणारा कमी भाव, यातच डांळीब पिकाच्या मुळावर निमॅटोड रोगाने घाला घातल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी संकट कोसळले. डाळींब झाडाच्या मुळाशी तयार होणाऱ्या नॅमिटोड नावाच्या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी अदामा कंपनीने औषध तयार केले आहे. कृषी विद्यापिठ राहुरी आणि अदामा कंपनीने राहाता तालुक्यात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित करत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठीचे मार्गदर्शन केले.

adama-company-invented-a-powder-named-nimitz-to-prevent-pomegranates-trees-from-nematode-1-1 in ahmednagar
निम्याटोडच्या नियंत्रणासाठी 'निमीट्ज' औषध तयार

निमॅटोड रोगामुळे डाळींबाच्या झाडाच्या मुळाशी गाठी तयार होतात. डाळींबाला दिले जाणारे खत पाणी हे निमॅटोड झाडाला मिळू देत नाही. त्यामुळे झाडाची वाढ आणि फळधारणा कमी होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भारतातील एकंदरीत नुकसानीचा आकडा एकवीस हजार कोटी रुपये इतका असल्याचे अदामा कंपनीचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

निम्याटोड रोग आणि त्यावरील उपाय 'निमीट्ज' या औषधाविषयीची माहिती देताना अदामा कंपनीचे अधिकारी व सरपंच मधुकर निर्मळ

अदामा कंपनीने या रोगावर सुत्रकृमीवर 'निमिट्ज' हे औषध तयार केले आहे. डाळींब झाडाच्या मुळाशी जिथे ठिबकने पाणी दिले जाते, त्याठिकाणी गोलाकार रिंगण करून हे औषध टाकल्यास निमॅटोडची वाढ बंद होते. झाडाला पोषक द्रव्य मिळाल्याने झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर फळेही येतात. त्यामुळे निमिट्ज हे औषध कसे काम करते? त्याचा उपयोग कसा करायचा? यासाठी राहुरी कृषी विद्यापीठ आणि अदामा कंपनीने राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री या डाळींब उत्पादक असलेल्या गावात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता.

निमॅटोड हा डाळींबाच्या झाडासाठी कॅन्सर असून त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. निमॅटोड रोगाला मारणारं हे औषध नसुन शेतकर्यांसाठी वरदान असल्याचं गावचे सरपंच आणि प्रगतशील शेतकरी मधुकर निर्मळ म्हणाले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अगोदरच मोठ्या अडचणींचा सामना करणा-या शेतकर्यांपुढे डाळींबावर आलेल्या नॅमिटोड रोगाचे संकट उभे राहिले आहे .. डाळींब झाडाच्या मुळाशी तयार होणा-या या रोगावर अदामा कंपनीने ओषध तयार केले असून कृषी विद्यापिठ राहुरी आणी अदामा कंपनीने राहाता तालुक्यात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित करत या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे...

VO_ अगोदरच दुष्काळ, पाणी टंचाई, पिकाला मिळणारा कमी भाव, शेतकर्याच्या मुळावर उठलेला असताना डांळींब पिकाच्या मुळावर नॅमिटोड रोगाने घाला घातला आहे.. नॅमिटोड रोगामुळे डाळींबाच्या झाडाच्या मुळाशी गाठी तयार होतात त्यामुळे डाळींबाला दिले जाणारे खत पाणी हे नॅमिटोड झाडाला मिळू देत नाही .. त्यामुळे झाडाची वाढ आणी फळधारणा कमी होवून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .. आपल्या भारतातील एकंदरीत नुकसानीचा आकडा जर बघीतला तर तो एकविस हजार कोटी रुपये असल्याचं अदामा कंपनीचे अधिकारी म्हणताहेत...

BITE _ सुनिल खटके अदामा कंपनी

VO_ अदामा कंपनीने या सुत्रकृमीवर निमीट्ज हे औषध तयार केले आहे .. डाळींब झाडाच्या मुळाशी जिथे ठिबकने पाणी दिले जाते त्या ठिकाणी गोलाकार रिंगण करून हे औषध टाकल्यास नॅमिटोडची वाढ बंद होते आणी झाडाला पोषण द्रव्य मिळाल्याने झाडाची वाढ चांगली होते आणी भरपुर फळेही येतात.. त्यामुळे निमीट्ज हे औषध कसे काम करते ? त्याचा उपयोग कसा करायचा? यासाठी राहुरी कृषी विद्यापिठ आणी अदामा कंपनीने राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री या डाळींब उत्पादक असलेल्या गावात तीन दिवसीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता..

BITE _ सुनिल खटके अदामा कंपनी

VO_ निमॅटोड हा डाळींबाच्या झाडासाठी कॅन्सर असून त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे .. निमॅटोड रोगाला मारणारं हे औषध नसुन शेतकर्यांसाठी वरदान असल्याचं गावचे सरपंच आणी प्रगतशील शेतकरी मधुकर निर्मळ म्हणताहेत....

BITE_ मधुकर निर्मळ सरपंच निर्मळ पिंप्री

VO_ शेतकरी अगोदरच आस्मानी आणी सुलतानी यासह विविध समस्यांचा सामना करत असताना डाळींबावर आलेला हा नॅमिटोडचा कॅन्सर लवकर बरा व्हावा हिच अपेक्षा....Body:MH_AHM_Shirdi Cancer Pomegranate Trees_24 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Cancer Pomegranate Trees_24 June_MH10010
Last Updated : Jun 24, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.