शिर्डी : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी महानिरीक्षक जमाबंदी आयुक्त सर्व प्रांताधिकारी यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेवून आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रीया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक आधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
याची गंभिर दखल विभागाने घेतली आहे असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, विदर्भ मराठवाड्यातील महसूल विभागात सुमारे ७० टक्के जागा यापुर्वी पासून रिक्त राहिल्या होत्या. अशा सर्व जागांवर आता आधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. परंतू काही ठिकाणी आधिकारी नेमुन दिलेल्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. या संदर्भातील तक्रारीही प्राप्त होत आहेत. अधिकारी हजर होत नाहीत अशा आधिकाऱ्यांना सध्या निलंबनाच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
अशा अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. प्रसंगी त्यांच्यावर मग सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल असा इशारा महसुल मंत्र्यांनी दिला आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटने बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना अतिशय गंभिर आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. याबाबतीतील संपूर्ण माहीती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे.
उंबरे येथील घटनेत कोणि दोषी सापटले तर या घटनेतील दोषिंवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. यापुर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या, त्यावेळी दोषींवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. उंबरे येथील घटना पाहाता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस आधिका-यांवर कारवाई करण्याच्या सुचना पण यापुर्वीच दिल्या गेलेल्या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तींबद्दल पुढे येवून माहीती देण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा :