ETV Bharat / state

Ahmednagar : यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन, वाहतूकी विरूद्ध कारवाई... - Ahmednagar

जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ( local crime branch ) वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. भीमा नदीपात्रात जलाशयात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळु उत्खनन व वाळु वाहनात भरुन वाहतुक करत असताना कर्जत तालुक्यातील खेड इथे धडक कारवाई करत बोट उध्दवस्त केली. तसेच यावेळी बोटीवर असलेल्या आणि अवैधपणे वाळू उपसा ( Illegal sand mining ) करत असलेल्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

bhima river sand red in Ahmednagar
यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळु उत्खनन
author img

By

Published : Nov 2, 2022, 5:17 PM IST

अहमदनगर : जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ( local crime branch ) वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. भीमा नदीपात्रात जलाशयात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळु उत्खनन व वाळु वाहनात भरुन वाहतुक करत असताना कर्जत तालुक्यातील खेड इथे धडक कारवाई करत बोट उध्दवस्त केली. तसेच यावेळी बोटीवर असलेल्या आणि अवैधपणे वाळू उपसा ( Illegal sand mining ) करत असलेल्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

अशी केली कारवाई - जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भीमा नदी पात्रात कर्जत तालुक्यातील खेड जवळ तेजस मोरे व चाँद शेख हे परप्रांतीय मजुरांचे सहाय्याने नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळु उत्खनन व वाळु वाहनात भरुन वाहतुक करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, पोकॉ रोहित मिसाळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चंद्रकांत कुसळकर यांनी एका स्पीडबोटीतून वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी जात शिताफीने कारवाई केली. अनेकदा पोलीस पथकाला पाहून वाळू उपसा करणारे तस्कर आणि त्यांचे कामगार पळून जात असताना, पोलीस पथकाने पर्यटक असल्याचा बहाणा करत बोटीवर जाऊन चार कामगारांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळु उत्खनन करताना

आरोपींना ताब्यात घेतले - यावेळी एक यांत्रिकी बोट व एक सेक्शन पंपाच्या साहयाने वाळू उपसा असणारी यंत्रणा पोलिसांनी पाण्यात बुडवून नष्ट केली. तसेच सुकरदी मंजुर शेख (32) , फारुख रोहिम शेख (32) दोन्ही रा. पहाडगांव, ता. उधवा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत, तर रफिकूल ऊर्फ इस्माल मुस्ताफा शेख (3) व रेजाऊल माजद शेख (24) हे दोन्ही रा. बाघपिंजरा, ता. मोहनपुरा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत यांना ताब्यात घेण्यात आले.

यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उत्खनन - यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान केल्याने चार आरोपी ताब्यात घेत अंदाजे 9,00,000/- (नऊ लाख रु.किंमतीचे) एक यांत्रिकी फायबर बोट पाण्यात बुडविली व एक सेक्शन पंपा ताब्यात घेवुन आरोपीं विरोधात कर्जत पोलीस स्टेशन भादविक 439, 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशनचे कर्माचारी करत आहे. आरोपींवर केलेली कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.