ETV Bharat / state

रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे हैदराबादमध्ये जेरबंद

रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे. जरे हत्या प्रकरणात अटक पाच आरोपी यांना बाळ बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे अटक आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले आहे. त्यामुळे मास्टरमाइंड असलेला बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या का केली, यामागील कोणकोणती कारणे आहेत, आदींचा तपास आता बाळ बोठेच्या अटकेने करता येणार आहे.

author img

By

Published : Mar 13, 2021, 9:21 AM IST

Updated : Mar 13, 2021, 11:50 AM IST

accused of rekha jare murder case
बाळ बोठे हैदराबादमध्ये जेरबंद

अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात सूत्रधार असलेला मास्टर माईंड वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी हैदराबाद मधून जेरबंद केला आहे.

हत्येनंतर साडेतीन महिने बोठे होता फरार-

30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची पुण्याहून नगरला येताना जातेगाव घाटामध्ये गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र हत्या झाल्यापासून या घटनेचा मास्टरमाईंड बाळ बोठे हा फरार होता. गेले साडेतीन महिने त्यांने पोलिसांना सतत गुंगारा दिला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते, अखेर शुक्रवारी पोलिसांनी हैदराबादमध्ये त्याच्या मुसक्या आवळून अटक केली आहे.

बाळ बोठेला लपून राहण्याससाठी मदत करणाऱ्यांची होणार चौकशी-

जवळपास साडेतीन महिने बाळ बोठे कुठे फरार होता. यादरम्यान त्याला लपवून ठेवण्यात आणि त्याला मदत करण्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, यालाही आता महत्त्व येणार आहे. कारण बाळ बोठे याची अनेक राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रातील मोठ्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बाळ बोठेला लपवून ठेवण्यात कोणी मदत केली याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. एकूणच रेखा जरे हत्या प्रकरणात अटक पाच आरोपी यांना बाळ बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे अटक आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले आहे. त्यामुळे मास्टरमाइंड असलेला बाळ बोठे याने रेखा जरे यांची हत्या का केली, यामागील कोणकोणती कारणे आहेत, आदींचा तपास आता बाळ बोठेच्या अटकेने करता येणार आहे.

बोठेच्या चौकशी नंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार-

पोलिसांनी बाळ बोठे आणि अटक पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असले तरी आता बाळ बोठेच्या चौकशीतून जे निष्पन्न होईल, त्या आधारे पोलीस पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करतील. या प्रकरणात पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मास्टरमाइंड असलेला बाळ बोठे हा सातत्याने पोलिसांना चकवा देत लपून होता. अखेर त्याला हैदराबाद मधून पोलिसांनी अटक करून नगरमध्ये आणलेले असून आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.

हे ही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअ‌ॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार

हेही वाचा - रेखा जरे हत्याकांड : पोलिसांनी डकवली बोठेच्या घरावर फरार असल्याची नोटीस

Last Updated : Mar 13, 2021, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.