ETV Bharat / state

Ahmednagar : धक्कादायक, मोबाईल चोरी करणाऱ्या व्यक्तीची केली हत्या, आरोपीस अटक, वाचा... - Ahmednagar

अहमदनर जिल्ह्यातून गुन्हेगारीची बातमी समोर आली आहे. मोबाईल चोरी केली म्हणून शहराजवळील धोत्री शिवारात 30 वर्षीय तरूणाचा खूनाची घटना २४ आँक्टोबर रोजी घडली होती. जामखेड पोलिसांनी या खुनाचा छडा लावत एका आरोपीला अटक ( accused arriest in murder case ) केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 7, 2022, 10:52 PM IST

अहमदनगर : अहमदनर जिल्ह्यातून गुन्हेगारीची बातमी समोर आली आहे. मोबाईल चोरी केली म्हणून शहराजवळील धोत्री शिवारात 30 वर्षीय तरूणाचा खूनाची घटना २४ आँक्टोबर रोजी घडली होती. जामखेड पोलिसांनी या खुनाचा छडा लावत एका आरोपीला अटक ( accused arriest in murder case ) केली आहे.

मोबाईल चोरणाऱ्याला झाली होती निर्घृण मारहाण - पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर २४ ऑक्टोबर रोजी बीडच्या गेवराई तालुक्यातील संगमजळगाव गावातील गणेश शिवाजी वारे (वय 30) या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, डोक्यावर, हातावर व पायावर काहीतरी टनक हत्याराने जबर मारहाण करुन जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले होते. या खून प्रकरणी मयताचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी अवघ्या १५ दिवसात केला.

मोबाईल चोरल्याने हत्या - दिपक रणजित भवर (सावरगाव, जामखेड) यास ५ नोव्हेंबर रोजी अटक केली असता मयत गणेश वारे याने आरोपी दिपकचा मोबाईल चोरल्यामुळे दुसरा आरोपी गणेश वारे (रा सावरगाव, जामखेड) या दोन आरोपींनी धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर बेदम मारहाण करत नग्न करून जीवे ठार मारले होते. हे तपासा दरम्यान उघड झाले.

एकास अटक एक फरार - अटक आरोपी दिपक भवर यास जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, डीवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने पार पाडली. या टीममध्ये तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस काँस्टेबल शिवाजी कोठूळे, विजय कोळी, आबासाहेब आवारे, डिबी पथकातील कर्मचारी आणि इतर कर्मचार्‍यांनी यशस्वी कामगिरी बजावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.