ETV Bharat / state

'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबादचे एन्काऊंटर योग्यच - अण्णा हजारे - हैदराबाद एन्काऊंटर अण्णा हजारे न्यूज

देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
author img

By

Published : Dec 8, 2019, 8:35 AM IST

अहमदनगर - देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे. हैदराबाद घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करून पळून जात होते. त्या परिस्थितीत त्यांचे झालेले एन्काऊंटर योग्य असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद एन्काऊंटर योग्यच - अण्णा हजारे

हैदराबाद येथील एका पशुवैद्यक महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काऊंटर झाले. सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काऊंटर करणेच योग्य आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही, असे अण्णा हजारे म्हणाले.

हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा

आपल्या देशाची राज्यघटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मिळत नसेल तर कायद्यात बदल केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Intro:अहमदनगर- 'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबाद एन्काऊंटर योग्यच -अण्णा हजारे Body:अहमदनगर- राजेंद्र ट्रिम
Slug-
mh_ahm_01_hajare_on_hydrabad_bite_7204297

अहमदनगर- 'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबाद एन्काऊंटर योग्यच -अण्णा हजारे

अहमदनगर- देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्यांचे खटले ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काउंटरच योग्य आहे, हैदराबाद घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करत पळून जात होते तर त्या परस्थितीत त्यांचे झालेले एन्काऊंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवरील बलात्कार, खून प्रकरणातील चार आरोपींचे एन्काऊंटर झाले. त्याबाबत बोलताना हजारे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींनाही अद्याप फाशी झालेली नाही.
आपल्या देशाची घटना सर्वोत्तम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकश विचार करून घटना तयार केली आहे. मात्र, या घटनेच्या चौकटीत राहून लवकर न्याय मिळत नसेल तर कायद्यात बदल केला पाहिजे आणि अशा पोलिस चकमकीला योग्यच म्हणावे लागेल, असे हजारे म्हणाले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- 'त्या' परिस्थितीत झालेले हैदराबाद एन्काऊंटर योग्यच -अण्णा हजारे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.