अहमदनगर : नगर पुणे रोडवर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात करण्यासाठी देवदर्शन करून गावी परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व भविक होते. त्यांच्या या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते : अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. हे भाविक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. या अपघाताबाबतची शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण एका टेम्पोमधून प्रवास करत होते.