शिर्डी - आषाढी एकादशीनिमित्ताने शिर्डी जवळील सावळविहीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुलांसाठी बाल वारकरी दिंडी आणि वृक्षदिंडी सह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांच्या मनात भक्तिभाव निर्माण व्हावा व संस्कार जागृत व्हावे यासाठी बालवारकरी दिंडी हा एक महत्वाचा उपक्रम शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंगाच्या पालखीचे पूजन राहाता पंचायत समितीच्या सभापती हिराताई कातोरे, ओमेशजी जपे यांच्या हस्ते करण्यात आले. या बालवारकरी दिंडीतील मुलांनी झाड़े लावा झाड़े जगवाचा संदेश यावेळी दिला.