ETV Bharat / state

अंगणवाडी व आशा सेविकांची मानधन वाढ विचाराधीन - मंत्री यशोमती ठाकूर - आशा सेविका मानधन यशोमती ठाकूर प्रतिक्रिया

अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजनेसह मानधनवाढ करण्याची बाब विचाराधीन आहे. याबाबत निश्चितच येत्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

Asha workers pay yashomati thakur react
आशा सेविका मानधन यशोमती ठाकूर प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 13, 2022, 7:10 PM IST

अहमदनगर - अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजनेसह मानधनवाढ करण्याची बाब विचाराधीन आहे. याबाबत निश्चितच येत्या काळात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

हेही वाचा - Development Of Shirdi Airport : शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी निधीची तरतुद संस्थाने केले निर्णयाचे स्वागत

संगमनेर येथील एकविरा फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या महासंकटात सेवाभावी पणे काम केलेल्या आरोग्य, अंगणवाडी व आशा सेविका, बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला. तर, अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांना सन्मानपत्र, जेवणाचे डबे, आरोग्य कार्ड, एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राज्यात महाविकास आघाडी सरकारने स्त्री-पुरुष समानतेसाठी सर्वसमावेशक असे नवीन महिला धोरण राबविले आहे. आरक्षणामुळे महिलांना राजकीय व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळाले आहे, हे आपण मान्य करतोच, पण महिलांना आरक्षणाबरोबर आदर मिळाला पाहिजे. यासाठी लोकांमध्ये जागृकता आली पाहिजे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनी कोरोना संकटामध्ये केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. राज्यभरातील या सर्व भगिनीसाठी आगामी काळात एलआयसी योजना, पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी धोरण ठरविण्यात येईल. तसेच, बाल संगोपनासाठी 2 हजार 500 रुपये दिले जात असून ते 5 हजार होण्याकरता सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. डीपीडीसी मधून महिला बालकल्याण व आशा सेविकांच्या व्यवस्थेसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवला जाणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजीव गांधी यांनी देशामध्ये सर्वप्रथम महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर हे आरक्षण 50 टक्के केले गेले असून महिलांना संधी मिळाली तर, ते अत्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळतात. कोरोना संकट काळामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी अत्यंत मोलाचे काम केले असून, गावातील प्रत्येक घरादारातील सुख दुःखात या महिला भगिनी सहभागी होत असतात. गावांचे आरोग्य जपणे यामध्ये या महिलांचे मोठे काम असून त्यांच्या पगारवाढीच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे.

एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील सर्व आशा, अंगणवाडी, आरोग्य सेविका व मदतनीस यांच्या ८ प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार असून यांच्यासोबत घरातील एक व्यक्ती किंवा नातेवाईक महिलांचीही तपासणी मोफत होणार आहे. या सर्वांना दर शनिवारी एसएमबीटी हॉस्पिटलला जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर या सर्व महिला भगिनींनी संगमनेर तालुक्यातील अग्रमानांकित अशा सहकारी शिखर संस्थांना भेट देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे थोरात यांनी सांगितले.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, कोरोना संकटात काम करणाऱ्या महिला भगिनींचा संगमनेरात होत असलेला कौतुक सोहळा हा देशातील एकमेव कौतुक सोहळा असावा. यातून काम करणाऱ्या महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळणार असून, प्रत्येक महिलेने आगामी काळात घराघरात जाऊन आहार बाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले.

हेही वाचा - Shirdi Sai baba Palkhi : साईबाबांच्या गुरुवारच्या मिरवणुकीचा पुनश्च 'श्रीगणेशा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.