ETV Bharat / state

'एक विवाह ऐसा भी'; अनाथ आश्रमातील मुलीने केलं शेतकरी पुत्राशी लग्न - उमेश पाटील या शेतकरी मुलाशी आश्रमातील शितल या तरुणीचे लग्न

शेतकरी मुलांना आज अनेक मुली लग्नासाठी नकार देत आहेत. त्यात आता खानदेशातील उमेश पाटील या शेतकरी पुत्राने शिर्डीतील अनाथालयातील शितल या तरुणीशी रेशीमगाठ बांधली ( girl an orphanage marriage a farmer boy ) आहे.

girl an orphanage marriage a farmer boy
girl an orphanage marriage a farmer boy
author img

By

Published : Jun 4, 2022, 9:08 PM IST

शिर्डी - शेतकरी मुलांना आज अनेक मुली लग्नासाठी नकार देत आहेत. त्यात खेडेगावात लग्न करुन जाण्यास मुली तयार होत नाही, असा अनुभव सध्याच्या तरुणपिढीला येत आहे. तसाच काहीसा अनुभव आलेल्या खानदेशातील उमेश पाटील या शेतकरी पुत्राने शिर्डीतील अनाथालयातील शितल या तरुणीशी रेशीमगाठ बांधली ( girl an orphanage marriage a farmer boy ) आहे. या लग्नात अनेकांच्या उपस्थितीने शितल अनाथ नसल्याचे दिसुन आले. माझे वडील शेतकरी होते, मीही शेतकरी मुलाशीच लग्नाची गाठ बांधणार, अशी माझी असलेली इच्छा पुर्ण झाल्याच शाश्रु नयनांशी शितलने सांगितले.

उमेश पाटील हा होतकरू तरुण शेतकरी. घरची चांगली परस्थिती शेती, गाई, म्हशी. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणून उमेशलाही अनेक मुलींनी नकार दिला. त्यात आपलं वय निघुन गेल्यावर पुन्हा लग्नाची अडचणी येईल ही चिंता उमेशला सतावत होती. दुसरीकडे सध्या लग्न लावून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट आणि त्यांच्या मार्फत लग्न केलेल्या मुली आठच दिवसांत फसवणुक करुन पळुन जात असल्याच्या बातम्याही उमेश पाहत होता. खेडेगावात आणि आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करेल अश्या मुलीच्या शोधात असताना उमेशला शिर्डीत साई आश्रम चालवत असलेल्या गणेश दळवींची माहिती मिळाली. त्यानंतर धुळे जिल्ह्यात राहत असलेल्या उमेश पाटीलच्या कुटुंबियांनी शिर्डी गाठत गणेश दळवींची भेट घेतली आणि लग्नायोग्य असलेल्या मुलीची मागणी घातली. गणेशनेही मुलाची योग्य चौकशी करत शितलच्या होकारांनर लग्न जमवले. उमेशनेही शितलशी लग्न करत आपल्याला नाकारनाऱ्या मुलींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वधु, वर यांची प्रतिक्रिया

शिर्डीतील गणेश दळवी हे साई आश्रया नावाने एक अनाथ आश्रम चालवतात. अनाथांना सहारा देतात अशीच शितलही साई आश्राला आली. गणेशने तिचा सांभाळ केला. शितलचे वडिलही शेतकरीच होते. मात्र, नियतीने तिला अनाथ केलं होत. वडिलांचा शेतकरी कुटुंबांचा वारसा पुढे चालविण्याची तीची इच्छा होती. पण, तीच लग्न कोणत्या कुटुंबीयांत होईल याची माहिती तिला नव्हती. जेव्हा शीतलला उमेश पाटील या शेतकरी पुत्राकडुन मागणी आली तेव्हा तिने लगेच होकार कळवला. शेतकरी नवरा नको म्हणाणाऱ्या मुलींना तीने दिलेली ही एक चपराकच म्हणावी लागेल.

हेही वाचा - Mumbai CCTV Project : मुंबईत ५ हजार सीसीटीव्हीचे काम रखडले; ३०० कोटी खर्चाच्या निर्णयासाठी ३ वर्षे वाया

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.