अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाजवळील ऐनतपूर येथे रस्त्याच्या कडेला एका 25 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला आहे. रवींद्र मोरे असे या मृताचे नाव आहे.
बेलापूर गावातील रहिवासी रवींद्र मोरे हा तरुण १८ जून मंगळवारी ऐनतपूर गावातील रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या अंगावर कोठेही जखमा नाहीत पण त्याच्या तोंडातून रक्त आलेले दिसत आहे. त्यामुळे त्याचा अपघात झाला, की अन्य काही कारणाने त्याचा मृत्यू झाला हे सध्या कोड्यात आहे. बेलापूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु केला आहे.