अहमदनगर - राहुरीतील मुळा धरणाच्या पाण्यात एक मच्छीमार बुडाला होता. त्यानंतर सुरू त्याची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदार, मंत्र्याचे स्विय सहाय्यक आणि ग्रामस्थ यांच्या २५ तासांच्या अथक शोधकार्यानंतर अखेर रविवारी दुपारी त्या मच्छीमार तरूणाचा मृतदेह सापडला आहे. नानाभाऊ रघुनाथ जाधव असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा - ट्रम्प यांच्या आग्रा भेटीदरम्यान रेल्वे गाड्यांना "नो एन्ट्री"
राहुरीतील मुळा धरणाच्या बॅक वाटरला चिंचाळा येथील हा ३५ वर्षीय तरूण मासेमारी करण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने शोधकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार तत्काळ तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या शोधकार्यात मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक विजय टापरे, तहसीलदारांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
हेही वाचा - 'ट्रम्प यांच्या दौऱ्याचा भारताला काही फायदा नाही'