अहमदनगर - शिर्डीतून एका वर्षांत चक्क 90 जण गायब झाल्याची माहिती आहे. तसेच औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतून मानवी तस्करी होत असल्याची शंका व्यक्त केली असतानाच साई मंदिर परिसराच्या गेट नंबर 4 जवळून 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत मुलीच्या आईने शिर्डी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - 'महाराजस्व अभियानात जनसामान्यांची प्राधान्याने कामे करू'
कुणाबाई कृष्णा सोलंकी (वय 42 रा. बॉदका ता. घटिया, उज्जैन मध्यप्रदेश सध्या राहणार निमगाव शिर्डी) ही महिला आपली उपजीविका चालविण्यासाठी शिर्डीत मोलमजुरी करते. तिला 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. दोन्ही मुली आईला मदत म्हणून मंदिर परीसरात बाबांच्या मूर्ती विकतात. मात्र, सोमवारी नेहमीप्रमाणे गेट नंबर 3 व 4 या ठिकाणी मूर्ती विक्री करत असताना गर्दीच्या ओघात आईची आणि मुलीची चुकामुक झाली. आई कुणाबाई हिने बऱ्याच वेळ शोधाशोध केली. मात्र, मुलगी मिळून आली नाही. तिच्या मैत्रिणींकडे आणि निमगावातसुद्धा शोध घेतला. मात्र, मुलगी मिळून न आल्याने आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा - साई बाबांच्या जन्मस्थळाबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे
शिर्डी पोलिसांनी तक्रार दखल करुन घेतली असून मुलीचा शोध सुरू केला आहे. मुलीच्या आईने माध्यमात दिलेल्या माहितीत तिच्याकडे अन्य 2 मुलीही होत्या. त्याही बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, तक्रारीत तसा उल्लेख करण्यात आला नाही. या 2 अल्पवयीन मुली सहारा म्हणून सांभाळत असल्याची माहिती कुणाबाई हिने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. कुणाबाईकडे स्वतःच्या मुली व्यतिरिक्त बाकी 2 मुली काय करत होत्या? आणि त्यांची कागदपत्रे, त्यांचे गाव, ओळखपत्र ही सर्व माहिती तिने का घेतली होती का? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.