अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, कोणतीही पूर्व सूचना, नोटीस न देता हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा दावा दुकानदारांनी केला आहे. तसेच या कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शेवगावमध्ये खळबळ उडाली आहे
हेही वाचा- राज्यात दोन दिवसात ६२ कोटी ५५ लाख रुपयांची मद्य विक्री
मागील काही दिवसांपासून काही लोकांच्या तक्रारीच्या आधारे वस्तुस्थितीची माहिती न घेता सर्व दुकानदारांना कोणतीही पूर्व नोटीस, सूचना न देता प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. ही बाब न्यायपद्धतीची पायमल्ली करणारी आहे. वार्षिक साठा पत्रकात बदल करुन खोट्या तक्रारी बनावट साठा पत्रक पुरावे म्हणून सादर केले आहे. सदरचे मूळ तक्ते प्रत्येक दुकानदाराकडे उपलब्ध आहेत. डी.बी बिहानी यांच्या दुकानाचा परवाना सुमारे 9 महिन्यापासून निलंबित आहे. मात्र, तरीदेखील वयोवृद्ध दुकानदार डी.बी बीहानी यांच्या नावे काही लोकांकडून वैयक्तिक आकसापोटी वारंवार तक्रारी करण्यात येतात, असे दुकानरांनी निवेदनात म्हटले आहे.
तसचे या कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील 95 स्वस्त धान्य दुकानदारांनी सामूहिक राजीनामे शेवगावचे प्रभारी तहसीलदार मयूर बेरड यांच्याकडे दिले आहेत.