अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे ४ जणांची चाकूने भोकसकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
नातिक कुंज्या चव्हाण (वय ४०) श्रीधर कुंज्या चव्हाण (वय ३२) नागेश कुंज्या चव्हाण (वय २० रा. सुरेगाव) व लिंब्या हबऱ्या काळे (वय २२ रा. देऊळगाव सिद्धी ता. नगर) अशी हत्या झालेल्या युवकांची नावे आहेत. सदर युवकांचे अन्य काही लोकांसोबत वाद सुरू होते. हे दोन्ही गट आज सायंकाळच्या सुमारास विसापूर फाटा येथे आमने सामने आले. यावेळी त्यांच्यामधील वाद चिघळला. त्यानंतर हल्लेखोरांनी उपरोक्त चारही युवकांचा पाठलाग करून त्यांची हत्या केल्याचे समजले आहे. दरम्यान, हत्येनंतर चारही युवकांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक संजय सातव या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा- नदीत वाहून गेलेले दोन युवक अजूनही बेपत्ता; शोध मोहीम सुरूच