शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी साईबाबा संस्थानच्या विविध विभागात काम करणारे विहित वयोमान ( 60 वर्षे) पुर्ण होवून सेवानिवृत्त होणाऱ्या 21 कर्मचाऱ्यांचा सत्कार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सेवानिवृत्ती कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्यावतीने आस्थपनेवरील माहे मे-२०२१ मध्ये विहित वयोमान (६० वर्षे) पूर्ण होवुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यामध्ये बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण विभागाचे मुकादम संजय पाटणी, मंदिर विभागाचे मुकूंद कापरे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या लॅब टेक्नीशियन लिली विद्यातील यांच्यासह विविध विभागांचे एकुण २१ कर्मचा-यांचा समावेश आहे. संस्थानच्यावतीने या सर्व कर्मचा-यांचा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी कान्हूराज बगाटे म्हणाले, आज २१ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने संस्थानमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज श्री साईबाबा संस्थानची गणना देशात क्रमांक ०२ ची आहे. या प्रगतीच्या प्रवासात या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नोंद उल्लेखनीय आहे. हे काम करत असताना या कर्मचा-यांचे नावे कोनशिलेवर कधी लागले नाही, परंतु त्यांनी केलेले काम नक्कीच उल्लेखीन असून संस्थानच्या नावलौकिकात त्यांचे मोठे योगदान आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचा आदर्श पुढील पिढीने घेवा व यापुढची वाटचाल करावी, असे सांगुन या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी कर्तव्याचे पालन करुन उत्तम सेवा केली त्याबद्दल कान्हूराज बगाटे यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी 14 हजार 123 नवे बाधित