ETV Bharat / state

अहिल्यादेवी वक्तव्य प्रकरण : 'हे' 2 आमदार खंबीरपणे शरद पवारांच्या पाठीशी - MLA Nilesh Lanke

आमदार रोहित पवार ज्या जामखेड-कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघातील चौंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर भाजपने पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, यावर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विरोधकांना प्रतिवाद केला आहे.

Rohit Pawar support Sharad Pawar
रोहित पवार पाठिंबा शरद पवार
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:57 PM IST

अहमदनगर - जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, आमदार रोहित पवार ज्या जामखेड-कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघातील चौंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर भाजपने पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, यावर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विरोधकांना प्रतिवाद केला.

माहिती देताना राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार

हेही वाचा - लग्न समारंभात रोख रक्कम-दागिन्यांवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तर टीकाकारांना एकीकडे कडक शब्दात सुनावत नम्र विनंती केली आहे. टीकाकारांना विनंती आहे की, राजकीय हेतूने टीका करू नका. शरद पवारांच्या वक्तव्याचा विरोधक विपर्यास करत आहेत. वास्तविक शरद पवार हे गेली पन्नास वर्षे राजकीय-सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या इतका गाढा अभ्यास कुणाचा नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बद्दलचा त्यांना असलेला अभ्यास टीका करणाऱ्यांना तरी आहे का, असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे.

टीका करणाऱ्यांची वैचारिक पातळी घसरलेली आहे. म्हणून देशाचे नेते असलेल्या शरद पवार यांच्यावर ते राजकीय हेतूने टीका करत आहेत, असा आरोप लंके यांनी केला. तसेच, टीकाकारांनी उगाच टीका करू नये, अशी विंनती देखील लंके यांनी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शरद पवार यांचे नातू रोहित पवार करतात. याच मतदारसंघातील जामखेड तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मगाव आहे. हा संदर्भ देत रोहित पवार यांनी, आपल्याला पवार साहेबांनीच या स्थळाचे महत्व निवडणुकीपूर्वी सांगितले होते. जेजुरी येथील भाषणातील फक्त मधले एक वाक्य पकडून होणारी टीका ही केवळ राजकीय आहे. वास्तविक शरद पवार यांच्या भाषणात या वाक्याच्या अगोदर आणि नंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचे जे महत्व सांगितले त्याबद्दल आदर व्यक्त करत त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली. त्याबद्दल विरोधक बोलत नाहीत. केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी विरोधक टीका करत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

पवारांच्या वक्तव्यावर राम शिंदेंनी केली होती टीका

दोन दिवसांपूर्वीच जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आमदार रोहित पवार ज्या जामखेड-कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघातील चौंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला. पवार यांच्या या वक्तव्यावर माजी मंत्री राम शिंदे यांनी टीका करत, पवार यांनी आपल्या नातवाला अहिल्यादेवी यांच्यापेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हंटले आहे. हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा अपमान आहे. आपल्या नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले होते.

हेही वाचा - केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला - आमदार सुधीर तांबे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.