ETV Bharat / state

संगमनेर तालुक्यातील 108 गावे कोरोनामुक्त - Sangamner pattern on corona fight

संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या. याचबरोबर घरोघरी नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामुळे १०८ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तर ४१ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत. लवकरच तेही कोरोना मुक्त होणार आहेत.

108 villages free from corona in sangamner
संगमनेर तालुक्यातील 108 गावे कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:32 PM IST

संगमनेर (अहमदनगर) - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत संगमनेर मधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रत्येक गावात प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. घरोघर तपासणी, तातडीचे विलगीकरण यांसह तालुक्यात नागरिकांच्या झालेल्या सर्वाधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे १०८ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तर ४१ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

संगमनेर पॅटर्न कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल -

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या थांबवण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाला सूचना देत होते. यानुसार संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या. याच बरोबर घरोघर नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावात ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या संगमनेर पॅटर्नमुळे कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले. देवकौठे ते बोटा असा मोठा विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात १७१ गावे व २६३ वाड्या-वस्त्या आहेत. पुणे, नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यांसह संगमनेरमध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यामुळे संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी संगमनेरात येत होते.

लवकरच ४१ गावे कोरोना मुक्त -

ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटल करीता चार अ‍ॅम्बुलन्स, पाच बायपॅप मशीन, तालुकास्तरावरील पहिले आरटीपीसीआर मशीन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसह अनेक आधुनिक सुविधा वाढविण्यात आल्या. याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासाठी ही विशेष मोहीम राबवली गेली. या विविध उपाययोजनांमुळे आज संगमनेर तालुक्यातील १०८ गावे कोरोनामुक्त झाली असून ४१ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहे. तर २८ गावांमध्ये एक कोरोना रुग्ण तर १३ गावांमध्ये २ जण उपचार घेत आहेत. लवकरच तेही कोरोना मुक्त होणार आहेत.

यांनी केले संगमनेर मॉडेल यशस्वी -

या सर्व कामी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली व प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जराड, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांसह प्रशासनातील विविध अधिकार्‍यांसह विविध शासकीय विभागातील कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका व अंगणवाडी, सेविका, डॉक्टर, नर्स व गावातील पदाधिकारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अहोरात्र काम केले. आणि संगमनेर मॉडेल यशस्वी करत तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.