अहमदनगर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 106 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची आकडा 1 हजार 677 वर पोहचला आहे. तर 111 रुग्ण आज सोमवारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याने आता उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 503 झाली आहे. तर आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 136 आहे.
जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रविवारी दिवसभरात 47 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नेवासा 8 (सोनई 7, सलाबतपुर 1), भिंगार 4, नगर ग्रामीण 6 (सारोळा कासार 1, बुऱ्हाणनगर 4, टाकळी खतगाव 1), श्रीगोंदा 9 (लोणी व्यंकनाथ 2, चांडगाव 1, कोळगाव 1, घारगाव 3, आजनुज 1, देवदैठण 1), राहुरी 4 (राहुरी बुद्रुक 1, देवळाली प्रवरा 3), शेवगाव 1( वडगाव), कर्जत 1(गणेशवाडी), संगमनेर 5 (राजापूर 1, मालदाड रोड 2, गणेशनगर 1, कुरण 1) , नगर शहर 7, श्रीरामपूर 8 आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील 1, या रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज सोमवारी 111 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामध्ये नगर ग्रामीण 1, नगर शहर 37,नेवासा 5, पारनेर 3, राहाता 4, पाथर्डी 14, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्द 2, राहुरी 4, संगमनेर 32, श्रीगोंदा 1, अकोले 7, कर्जत 1, या रुग्णांचा समावेश आहे.