कोलंबो - भारतीय युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता आणखी दोन भारतीय खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, युझर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोनाची लागण झाली आहे.
-
COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67
">COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2021
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67COVID-19: Yuzvendra Chahal and K Gowtham test positive in Sri Lanka
— ANI Digital (@ani_digital) July 30, 2021
Read @ANI Story | https://t.co/1wL0NKVvEF#YuzvendraChahal #KGowtham #Cricket pic.twitter.com/vqmUKzYA67
चहल आणि गौथम यांच्याआधी कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते.
आता चहल आणि गौथम यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आता हे दोघे कृणालसोबत रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत श्रीलंकेत राहतील.
श्रीलंकेच्या प्रोटोकॉलनुसार, कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूला क्वारंटाइन केलं जातं. उपचारानंतर काही दिवसांनंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येते. यात जर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्याला प्रवासासाठी परवानगी मिळते.
कृणाल, चहल आणि गौथम वगळता इतर खेळाडू भारतात परतणार
हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, दीपक चहर, मनिष पांडे आणि इशान किशन हे आज भारतासाठी रवाना होणार आहेत.
भारताने टी-20 मालिका गमावली -
फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. श्रीलंका संघाने तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना 7 गडी राखून जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली. श्रीलंकेच्या विजयात वानिंदु हसरंगाने 4 गडी बाद करत मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्याने फलंदाजीत नाबाद 14 धावांचे योगदान दिले.
भारताने 82 धावांचे माफक लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर धनंजया डिसिल्व्हा आणि हसरंगा यांनी चौथ्या गड्यासाठी 26 धावांची भागिदारी करत श्रीलंकेला 14.3 षटकांत विजय मिळवून दिला. फिरकीपटू राहुल चहरने भारताकडून तीन बळी मिळवले.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. तेव्हा कर्णधार शिखर धवन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. या धक्क्यातून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरूच शकला नाही. हसरंगाने ऋतुराज गायकवाड (14), संजू सॅमसन (0), भुवनेश्वर कुमार (16) आणि वरुण चक्रवर्ती (0) यांना बाद केलं. कुलदीप यादव 23 धावांवर नाबाद राहिला. भारताला 20 षटकांत 81 धावांपर्यंत मजल मारता आली.
हेही वाचा - IND VS SL : भारतीय क्रिकेटर कृणाल पांड्याला कोरोनाची लागण
हेही वाचा - India tour of England : दोन खेळाडूंना इंग्लंडचे बोलावणे आले; टीम इंडियात बदल