ETV Bharat / sports

Tokyo Olympics : बेल्जियमकडून पराभवानंतर खेळाडू गुरूजंत सिंगच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर - gurjant singh

टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव झाला. पराभवानंतर भारतीय खेळाडू गुरुजंत सिंग यांच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर झाले.

tokyo-olympics-2020-team-india-vs-belgium-semi final-match-gurjant-singh-family-reaction
Tokyo Olympics : बेल्जियमकडून पराभवानंतर खेळाडू गुरूजंत सिंगच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर
author img

By

Published : Aug 3, 2021, 12:45 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव झाला. या पराभवाने भारतीय हॉकी संघातील खेळाडू तसेच खेळाडूंचे कुटुंबीय आणि चाहते निराश झाले आहेत. पराभवानंतर भारतीय खेळाडू गुरुजंत सिंग यांच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर झाले.

सामना संपल्यानंतर गुरजंतच्या बहिणीने सांगितलं की, आपण उपांत्य फेरीत पोहोचलो ही अभिमानाची बाब आहे. अमृतसरच्या जंडियालामध्ये गुरजंत राहतो. भारताच्या पराभवानंतर गुरजंतची बहिण आणि तिच्या आईला रडू आवरलं नाही.

दरम्यान, यावेळी गुरजंतच्या कुटुंबीयांनी, हार-जीत होत राहते. पण पेनाल्टी कॉर्नरने सामन्याचे रुप पालटल्याचे सांगितलं.

मोदींनी केली कर्णधार मनप्रीत सिंहची फोनवरून बातचित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपांत्य सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्याशी फोनवरुन बातचित केली. यात त्यांनी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केलं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला कांस्य पदकाची संधी आहे. यावर गुरुजंत सिंगच्या कुटुंबियानी आपण कांस्य पदक जिंकू, अशा आशा व्यक्त केली. भारतीय संघ तब्बल चार दशकानंतर उपांत्य फेरीत पोहोचला होता. यामुळे भारतीय संघाच्या सुवर्ण पदकाच्या आशा वाढल्या होत्या.

भारताने असा गमावला सामना

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाला. बेल्जियमने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या पराभवासह तमाम भारतीयाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चांगला खेळ करणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या क्वार्टरमधील चूका भोवल्या आणि भारताने हा सामना गमावला.

हेही वाचा - Tokyo Olympic : उपांत्य फेरीतील पराभवानंतर मोदींनी केला भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराला फोन

हेही वाचा - Tokyo Olympics : मंगोलियाच्या खेळाडूचा पराभव झाला, पण पदकाची संधी हुकली भारतीय सोनमची, कसं काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.