हैदराबाद - टोकियो ऑलिम्पिकमध्ये 24 जुलै रोजी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताचे पदक तालिकेत खाते खोलले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई हिने 49 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळाले. मीराबाईने 202 किलो वजन उचलून दुसरे स्थान मिळवले. स्नैच मध्ये मीराबाईने दूसऱ्या प्रयत्नात 89 आणि क्लीन तथा जर्कमध्ये दूसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलले. चीनच्या जीहोई होउ हिने सुवर्ण पदक जिंकले. त्याचबरोबर मीराबाई भारोत्तालनमध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला बनली. तिच्यापूर्वी 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते.
जाणून घ्या रविवारी कोणत्या खेळाडूकडून पदकाची अपेक्षा -
पीव्ही सिंधु - बॅडमिंटन
रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती पीवी सिंधु रविवारी टोकियो ऑलिम्पिकच्या अभियानाला सुरुवात करेल. इस्राइलच्या केसिया पोलिकारपोवा बरोबर तिची लढत होत आहे. सिंधु, विश्व चॅपियनशिपची सुवर्ण पदक विजेतीही आहे. ती यावेळी मागील रियो प्रदर्शनहून अधिक चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या सिंधुला ग्रुप जे मध्ये हांगकांगटी चेउंग नगन यी आणि पोलिकारपोवा बरोबर सामील केले आहे. चेउंग आणि पोलिकारपोवा यांची रँकिंग पाहता सिंधु ग्रुपमध्ये अव्वल येऊन पुढच्या फेरीत पोहचण्याची प्रमुख दावेदार आहे.
मेरी कोम- बॉक्सिंग
भारतीय बॉक्सर मेरी कोम टोकियोमध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या कांस्य पदकाच्या कमाईहून चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. विश्व बॉक्सिंग चँपियनशिपचे सहावेळी सुवर्णपदक जिंकणारी कोम रविवार सकाळी आपल्या टोकियो ऑलिम्पिक अभियानाला सुरुवात करेल. मेरी कोमचा सामना डोमिनिकन गणराज्यची मिगुएलिना हर्नान्डेज गार्सियाविरुद्ध होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक 38 वर्षाच्या या फ्लाईवेट वर्गातील खेळाडूला भारतीय बॉक्सरला सुवर्ण पदक जिंकण्याची शेवटची संधी आहे.
मनु भाकर, यशस्विनी सिंह देसवाल- नेमबाजी
भारतीय नेमबाजांनी टोकियो ऑलिम्पिक अभियानाची सुरुवात निराशाजनक केली आहे. सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टल पदक स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला. तर त्याचा साथीदार अभिषेक वर्मा फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.
त्यापूर्वी वर्ल्ड नंबर 1 इलावेनिल वालारिवन आणि वर्ल्ड नंबर 15 अपूर्वी चंदेला 10 मीटर एअर रायफल फायनलमध्ये क्वॉलीफाय करू शकला नाही.
यामुळे रविवार सर्वांची नजर यशस्विनी सिंह देसवाल आणि मनु भाकर यांच्या कामगिरीवर राहील. या दोघी महिलाच्या 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धेत भाग घेतील.
दिव्यांश पवार- शूटिंग
नेमबाजांकडून टोकियो ऑलिम्पिमध्ये भारताला पदकाची अपेक्षा आहे. जागतिक 8 व्या नंबरचा खेळाडू पवार यांच्याकडून 10 मीटर एयर रायफल शूटींगमध्ये पदकाची आशा आहे.
18 वर्षाच्या एथलीट दिव्यांशने दोन वेळा जूनियर वर्ल्ड गोल्ड मेडलिस्ट 2019 मध्ये यशस्वी झाला आहे.
भारतीय पुरुष टीम - हॉकी
शनिवारी न्यूझीलंडवर 3-2 ने विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी टीम रविवारी आपल्या दूसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या सामन्यावर भारतीय हॉकीप्रेमींची नजर असणार आहे.